आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस एजन्सीचालकांकडून आधार कार्डसाठी सक्ती

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - सर्वोच्च न्यायालयाने ‘आधार कार्ड’ची सक्ती नसल्याचे स्पष्ट केल्यानंतरही येथील गॅस एजन्सीचालकांकडून आधार कार्डची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. एजन्सीचालकांच्या या मनमानीपणावर प्रशासनाकडून नियंत्रण घालण्यात यावे, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.

गॅस एजन्सीचालकांनी अनेक दिवसांपासून आधार कार्ड सक्तीचे करत ग्राहकांना वेठीस धरले जात आहे. अनुदान थेट बँकेच्या खात्यात वळते करण्यासाठी आधार कार्ड व बँकेच्या खात्याची गरज असल्याचे सांगत एजन्सीचालक ग्राहकांना आधार कार्डची मागणी करत आहेत. शहरात तूर्तास केवळ 50 टक्के नागरिकांकडे आधार कार्ड असून, पुरेशी सोय आधार कार्ड नोंदणीची केली नसल्याने अद्याप लाखो नागरिकांचे आधार कार्ड तयार नाहीत. त्यामुळे गॅस एजन्सीचालकांनी अचानक केलेल्या आधार कार्ड सक्तीमुळे रोष व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन एजन्सीचालकांना सूचना द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

वेबसाइटवर अर्ज
गॅस सिलेंडरचे थेट अनुदान 1 नोव्हेंबरपासून ग्राहकांच्या खात्यात जमा होणार आहे. त्या दृष्टीने संबंधित बँक खात्याशी आधार क्रमांक संलग्नित करावयाचा आहे. हे अर्ज ‘डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट अकोला डॉट एनआयसी डॉट इन’ या वेबसाईटवर उपलब्ध आहेत. ही संपूर्ण माहिती 31 ऑक्टोबरपर्यंत जमा करावी लागणार आहे. ’’ नरेश वंजारी, जिल्हा पुरवठा अधिकारी