आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LPG Gas Cylinder News In Marathi, Akola, Consumer, Divya Marathi

जिल्हा पुरवठा विभागामधून सिलिंडरची ‘गॅसगळती’ सुरूच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शहरातील गॅस पुरवठा प्रणाली ‘लीक’ झाली असून, ग्राहकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे पद सध्या रिक्त असल्याने ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी पुरवठा विभागातील अधिकारी हेतूपुरस्सर दुर्लक्ष करत आहे,असे ग्राहकांचे म्हणणे आहे. दरम्यान, गॅस सिलिंडर मिळण्यासंदर्भात वितरकांकडून होणार्‍या अनियमिततेबाबत ग्राहकांनी तक्रार केल्यास त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असे शहर पुरवठा विभाग अधिकारी अशोक शिंदे यांनी सांगितले.


घरगुती गॅस सिलिंडर आवश्यक वस्तूंच्या यादीमध्ये आहे. त्याच्या नियंत्रणासाठी शासनाने पुरवठा विभाग स्वतंत्रपणे कार्यान्वित केला आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर किमान तीन दिवसांत गॅस सिलिंडर मिळाले पाहिजे, असा नियम आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत वितरकांनी घरपोच सेवा विहित मुदतीत करण्याचेही मान्य केले होते. मात्र त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. ऑनलाइन नोंदणी केलेल्या ग्राहकांना क्रमाने सिलिंडर दिले पाहिजे. परंतु, तसे होत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. आधीच महागाई वाढलेली असताना ग्राहकांना वितरकाच्या गोदामावरून स्वत: गॅस सिलिंडर आणण्यात 30 ते 50 रुपये भुर्दंड सहन करावा लागतो. अशाप्रकारची परिस्थिती शहरात असताना पुरवठा विभागाचे मात्र या प्रकाराकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.


गाडीवाला मागतो जास्तीचे पैसे
एखादेवेळी घरपोच गॅस सिलिंडर मिळाले, तर गॅस सिलिंडर पोहोचवणारे 30 ते 50 रुपये जादा मागतात, यासंदर्भात त्यांना विचारले असता, वितरकांकडून आम्हाला वेतन मिळत नाही, या पैशावरच आमची गुजराण होते. त्यामुळे तुम्ही, 10, 20 रुपये जास्त द्या, असे ते म्हणतात, अशी ग्राहकांची तक्रार आहे. दुसरीकडे गॅस वितरकांकडे विचारणा केली असता, तुम्ही त्यांना पैसे देऊ नका, त्यांना वेतन दिले जाते, असे ते सांगतात.
मी प्रगती एंटरप्रायझेसअंतर्गत इंडेन कंपनीचा ग्राहक आहे. माझा नोंदणी क्रमांक 38 आहे. नोंदणी केल्यानंतरही अद्याप माझ्याकडे गॅस सिलिंडर आले नाही. सदाशिव राऊत, ग्राहक


चौकशी करतो
शहरातील गॅस सिलिंडरच्या पुरवठय़ाबाबत चौकशी करतो. ग्राहकांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्यास गॅस वितरकांविरुद्ध निश्चित कारवाई करण्यात येईल. अशोक शिंदे, शहर पुरवठा अधिकारी