आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस सिलिंडरचे अनुदान जमा करण्यात घोळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - घरगुती गॅस सिलिंडरवरील सबसिडी ग्राहकाच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. नऊ सिलिंडरसाठी प्रती सिलिंडर 591 रुपयांची सबसिडी मिळणार आहे. अनेक ग्राहकांनी पूर्ण प्रक्रिया केली असली तरी, काही दिवसांपासून सबसिडी जमा होण्यात घोळ होत आहे.
सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा होण्यासाठी गॅस एजन्सीकडे नोंदवलेला आधार क्रमांक बँकेतही देणे बंधनकारक आहे. दोन्ही ठिकाणी आधार क्रमांक लिंक झाल्यानंतरच सबसिडी खात्यात जमा होणार आहे. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही खात्यात सबसिडी जमा होण्यात घोळ होत असल्याने ग्राहकांचा मनस्ताप वाढला आहे. संबंधित गॅस कंपनीच्या विक्री अधिकार्‍यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांनी जिल्हा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. अद्याप याची दखल घेतली गेली नाही. केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे एका ग्राहकास दरवर्षी नऊ सिलिंडर सबसिडीवर मिळणार आहेत. यापेक्षा जास्त सिलिंडर घेण्यासाठी एक हजार 50 रुपये मोजावे लागतील. सबसिडीवर सिलिंडर घेताना खुल्या दरानेच म्हणजेच एक हजार 50 रुपयांना घ्यावे लागेल. एकाच वेळी मोठय़ा रकमेचा भुर्दंड पडू नये म्हणून, प्रत्येकाच्या खात्यात सरासरी 435 रुपये अँडव्हान्स स्वरूपात जमा होणार आहे. म्हणजेच पहिल्या महिन्यात अँडव्हान्स स्वरूपातील 435 रुपये आणि सबसिडीचे 591 रुपये असे 1,026 रुपये खात्यात जमा होणार आहे. त्यापुढील सिलिंडरची 591 रुपये सबसिडी खात्यावर जमा होईल.
सिलिंडर 3.46 रुपयाने महागले : सबसिडीवरील एलपीजी गॅस सिलिंडर 3.46 रुपयाने महागले आहे, तर विनाअनुदानित सिलिंडरवर 4.25 रुपये अधिक मोजावे लागतील. ही दरवाढ सरकारने 10 डिसेंबरला केली आहे.

तक्रार नाही
गॅस सबसिडीबाबत एकही तक्रार प्राप्त झाली नाही. सबसिडीसंदर्भात योग्य माहिती ग्राहकांना दिली जात आहे.
लोकेश सक्सेना, विक्री अधिकारी, एलपीजी गॅस कंपनी.