आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम करणार्‍यांना ठेवावा लागेल ‘एलबीटी’चा हिशेब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- मनपाने सरसकट बांधकामांवर एलबीटी लावण्याची भूमिका घेतल्याने त्याचा फटका वैयक्तिक बांधकामांनाही बसणार आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. बांधकाम करणार्‍यांकडून एलबीटीची विचारणा करावी लागणार असल्याची भूमिका मनपाने मांडली आहे. शहरात बांधकाम करणार्‍यांना आता एलबीटीचा हिशेब ठेवावा लागणार आहे.
मनपाने बांधकामांवर एलबीटी आकारण्याची भूमिका घेतली आहे. बांधकाम क्षेत्रावर एलबीटी आकारण्यात येत होता़ मात्र, आता सुपरबिल्टअप एरियातील वाहनतळ, तळमजला, जिना व बाल्कनीवरही हा कर आकारला जाणार आह़े यात टीडीआरचाही समावेश असेल़ घर मक्तेदाराकडून बांधले तर कर त्याच्याकडून वसूल केला जाणार आहे. एखाद्याने स्वतंत्ररीत्या घर बांधले तर त्यालाही एलबीटीची विचारणा करण्यात येणार आहे. बांधकाम करताना काही माल शहरातून किंवा शहराबाहेरून आणला जातो. एलबीटी पेड शहरातील माल खरेदी केल्यास त्याचे बिल सांभाळून ठेवावे लागणार आहे. एलबीटीचे अधिकारी बांधकाम करणार्‍यांकडे साहित्याचे बिल मागू शकतील. बांधकाम करताना एकरकमी एलबीटी भरता येणार आहे. याशिवाय टप्प्याटप्प्यानेही एलबीटी भरावा लागणार आहे.