आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madhavanatha Maharaj Death Anniversary,Latest Ws N Divya Marathi

टाळ, मृदंगाच्या गजरात शहरात निघाली पालखी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- रामदासपेठ येथील श्रीनाथ दत्त मंदिरात सुरू असलेल्या माधवनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सवाचा समारोप शनिवारी, 22 मार्चला झाला. सायंकाळी 5 वाजता टाळ, मृदुंगाच्या गजरात पालखीचे परिसर भ्रमण झाले. पालखी सोहळ्यात अनेक भजनी मंडळांतील महिलांनी भजने सादर केली. महिलांनी फुगडीचे फेर धरले. पालखी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
एकनाथ षष्ठीनिमित्त सकाळी मंदिरात लघुरुद्र व अखंड नामसप्ताहाची समाप्ती झाली. दुपारी महाआरती व महाप्रसादाचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. सायंकाळी 7 वाजता गीतांजली पूर्णारती भजनाने कार्यक्रमाचे समापन झाले. 28 ते 31 मार्चदरम्यान मंदिरात माधवनाथ महाराज जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 28 ते 30 मार्चदरम्यान रोज दुपारी तीन विविध महिला भजनी मंडळांच्या भजनाचे कार्यक्रम आणि सायंकाळी 7 वाजता भक्तिसंगीताचा कार्यक्रम होणार आहे.
31 मार्चला सकाळी 6 वाजता जन्मोत्सव अध्याय वाचन, सकाळी 7 वाजता रुद्राभिषेक व पारायण समाप्ती, दुपारी 12 वाजता महाआरती व महाप्रसाद, तर सायंकाळी 7 वाजता र्शीनाथ गीतांजली पूर्णारती भजन होणार आहे.15 ते 31 मार्चदरम्यान 13 लाख सामूहिक नामजपाचा संकल्प करण्यात आला आहे. भाविकांनी मंदिरात जप करून त्याची नोंद मंदिरात करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.