आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘महा ई-सेवा’चे सर्व्हर डाऊन; महसूल विभागाचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- गेल्या दोन दिवसांपासून शहरातील महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन असल्यामुळे नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहेत. याचाच फायदा घेत महा ई-सेवा केंद्र संचालकांकडून नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत आहे. या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

नागरिकांच्या सेवेकरिता शासनाने महा ई-सेवा केंद्र सुरू केलेआहेत. मात्र, याचा फायदा होण्याऐवजी नागरिकांना हेलपाटे सहन करावे लागत आहेत. विद्यार्थ्यांना व नागरिकांना शासनाच्या विविध दाखल्यांची गरज भासत आहे. पैसे देऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र शहरात आहे. शासनाने एका आदेशानुसार, सहा लाख रुपयांच्या उत्पन्न र्मयादा असलेल्या कुटुंबातील पाल्यांचा शैक्षणिक सवलतींसाठी नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र तीन वर्षांपासून एकदाच काढावे लागणार असून, प्रमाणपत्र तीन वर्षांपर्यंत वापरता येणार आहे. परंतु महा ई-सेवा केंद्रांमध्ये या आधीच नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्यांना केवळ एक वर्षांचे प्रमाणपत्र मिळणार असल्याचे महा ई-सेवा केंद्राद्वारे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संबंधित यंत्रणेविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.


ऑफलाइनमुळे शासनाला चुना
महा ई-सेवा केंद्राचे सर्व्हर डाऊन झाले आहे. त्यामुळे शहरात केंद्राचे आता ऑफलाइन कामकाज सुरू आहे. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत आहे. सेतू केंद्र सुरू असताना हा प्रकार कधीच झाला नव्हता, त्यामुळे पुन्हा तत्काळ सेतू केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.

माहिती देण्यात आली
संबंधिताना याची माहिती देण्यात आली आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. याबाबत नायब तहसीलदारांना जबाबदारी देण्यात आली आहे.
-सोहम वायाळ, उपविभागीय अधिकारी