आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाबीजकडून ८२ शेतकऱ्यांना मदत, सामाजिक बांधिलकीतून साहाय्य करणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बियाण्यांची उगवण झाल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत असून, यासंदर्भात सुरू असलेल्या पंचनाम्याची पडताळणी करून शेतकऱ्यांना मदत करण्यात येत आहे. बोरगाव सर्कलमधील ८२ शेतकऱ्यांना बुधवारपर्यंत धनादेश वितरित करण्यात आले आहेत. यातील १५ शेतकऱ्यांना फेरपेरणीसाठी साहाय्य करण्यात आले आहे
.
सोयाबीन बियाण्यांची उगवणच झाली नाही त्यामुळे नुकसान झाले आहे, त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. ३० हजार रुपये एकर भरपाई द्या, अशी मागणीही झाली. परंतु, महाबीजच्या नियमानुसार मदत दिली जाईल, असे महाबीजच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार बियाण्यांच्या लॉटची पडताळणी, शेतकऱ्यांकडील मूळ बिलाची तपासणी, बियाण्याच्या पशिवीचा टॅग यांची तपासणी केली जात आहे. शेतकऱ्यांनी महाबीजचे बियाणे वापरले की नाही, हा त्यामागील उद्देश आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे प्राप्त झाले त्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले आहे, तर उर्वरित शेतकऱ्यांनाही धोरणानुसार मदत दिली जाणार आहे. महाबीजचे बियाणे शेतकऱ्यांनी पेरले होते की नाही याची चाचपणी केली जात आहे. बियाणे उगवण होण्यास पेरणीनंतर भरपूर पाऊस होणे, पावसाचे प्रमाण कमीअधिक राहणे, ट्रॅक्टरने खोल पेरणी झाली तरी बियाण्यांची उगवण योग्यप्रकारे होत नाही. सोयाबीनचे बियाणे मुळातच खूप नाजूक असल्याने त्याची हाताळणी पद्धतशीरपणेच करावी लागते.

महाबीज बियाण्यांच्या पशिवीसोबत थायरम बुरशीनाशक दिले जाते. तसेच त्याचा वापर करण्याची कृतीही सांगितलेली असते. मात्र, अनुभव असा आहे की शेतकरी बुरशीनाशकाचा योग्यरीत्या वापर करीत नाहीत. उगवण चांगली होण्यासाठी बुरशीनाशक वापरणे फायद्याचे ठरते. घरचे बियाणे असले तरी थायरमची ट्रिटमेंट दिली तर उत्तम उत्पादनासाठीच त्याचा लाभ होणार असतो, याकडेही कृषीतज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे.

सामाजिक बांधिलकीतून शेतकऱ्यांना मदत
महाबीजनेआजवर शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केलेला आहे. शेतकरी हित सर्वतोपरी आहे. याहीवेळी बियाणे बाजारात आणताना खूप काळजी घेण्यात आली. चार-पाच वेळा विविध प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या. तसेच ज्या बियाण्यांची उगवण क्षमता योग्य नाही, असे बियाणे बाजारात आणलेच नाही. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना मदत देताना महाबीजचा उद्देश सामाजिक बांधिलकीचाच आहे. नियमानुसार शेतकऱ्यांना मदत दिली जात आहे.'' उमाकांतगावंडे, विभागीयव्यवस्थापक, महाबीज, अकोला.