आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामानवाला अभिवादन : डॉ. बाबासाहेबांचे विचार अंगीकारण्याचा संकल्प

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 57व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमधून बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. बाबासाहेबांचे विचारच समाजाला दिशा देणारे असून त्यांनी दाखविलेल्या मार्गाने चालण्याचा संकल्पही घेण्यात आला.

राष्ट्रवादी कॉग्रेस
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अशोक वाटिका येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रतिभा अवचार, बाळापूर विधासभेचे प्रतिनिधी ओम सावल, प्रा. विजय उजवने, दिलीप आसरे, पंचायत समिती सदस्या रुपाली वाकोडे, सविता वाघमारे, सदाशिव शेळके, रामेश्वर पाटील वाघमारे, उज्वल राऊत, रमण हेडा, राजू शर्मा, जुलेखा चव्हाण, लता वर्मा, लता मते, पुष्पा वाघमारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
व्यसनमुक्ती अभियान
अखिल भारतीय सम्राट सेनेतर्फे व्यसनमुक्ती अभियानाची शपथ घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली. अशोक वाटिका येथे 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यसनमुक्तीसाठी संकल्प करण्यात आला. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल खंडारे यांनी व्यसनाचे दुष्परिणाम सांगून अभियानाविषयी माहिती दिली. जिल्हाध्यक्ष संतोष दांदडे यांनी बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या वेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, उपासक व उपासिका उपस्थित होते.
खंडेलवाल शाळेत वक्तृत्व स्पर्धा
शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित खंडेलवाल मराठी प्राथमिक शाळेत 6 डिसेंबरला वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. यात के. जी. टू. मधील अनुराग शेकोकार, इयत्ता 1 ते 4 या गटात वैष्णवी आखरे व सृष्टी जवळेकर, इयत्ता 5 ते 7 या गटातून गौरी भिरड व प्रज्ञा वानखेडे यांनी प्रथन क्रमांक पटकावला. त्यांचा भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. याशिवाय नागपूर येथे झालेल्या अँबॅकस स्पर्धेत उत्तेजनार्थ बक्षिस मिळवल्याबद्दल प्रणाली घाटोळे, शाळेत महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त झालेल्या भाषण स्पर्धेत प्रथम आलेल्या अनिकेत दांदडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी शामराव गोतमारे यांनी प्रत्येकाने बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवावा, असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन सातवीतील प्रणाली घाटोळे व र्शुती अवातिरक या विद्यार्थिनींनी केले. आभार राहुल क्षार यांनी मानले. या वेळी शालेय समितीच्या अध्यक्षा रेखा खंडेलवाल, मुख्याध्यापिका गीता चांदवडकर, ज्येष्ठ शिक्षिका गंगा खेडकर, पर्यवेक्षिका जोध यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
मलकापूर तंटामुक्ती समिती
मलकापूर ग्रामपंचायत परिसरात आयोजित कार्यक्रमात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. या वेळी समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पाटील, सरपंच राजू वगारे, उपसरपंच किसनराव भिसे, मनोहर गवळी, प्रकाश वानखडे यांनी बाबासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला. या वेळी ग्रामपंचायत सदस्य भगवान भागानगरे, सिद्धार्थ वानखडे, अमोल खैरे, उमेश कल्ले, मनोज इंगोले, बाबराव दंदी आदी उपस्थित होते.
सावित्रीबाई फुले विद्यालयात कार्यक्रम
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयात कार्यक्रम संपन्न झाला. मुख्याध्यापक चिमणकर व संतोष कांबळे यांनी मार्गदर्शन केले. सलोनी वाघ, शिल्पा गायकवाड, राणी कांबळे या विद्यार्थ्यांनी भाषणातून बाबासाहेबांच्या कार्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य कांबळ व आभार प्रदर्शन शिल्पा गायकवाड या विद्यार्थ्यांनी केले. या वेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेस
अशोक वाटिका येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी जिल्हाध्यक्ष शिवा मोहोड यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस हारार्पण करून मार्गदर्शन केले. या वेळी महासचिव स्वप्निल देशमुख, जिल्हा संघटक बाळासाहेब तायडे, विद्यार्थी कार्याध्यक्ष सागर देश्मुख, वैभव घुगे, जिल्हा सचिव किरण अवताडे, गजानन पातोंड, एकनाथ वानखडे, राजेश घोडे, निखील तायडे, संतोष दाभाडे आदी उपस्थित होते.
लहुसेना फाऊंडेशन
लहुसेना फाऊंडेशनच्या वतीने अशोक वाटिका येथे बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष तुळशीराम चव्हाण यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा गवई यांनी केले, तर आभार प्रदर्शन शारदा वानखडे यांनी केले. या वेळी लहुसेनेचे अध्यक्ष संजय वानखडे, उपाध्यक्ष नीलेश नृपनारायण, पंजाबराव अंभोरे, प्रभाकर शंकपोवळे, गोपाल वानखडे, संतोष चव्हाण, र्शीकृष्ण गवई, सुरेश वारके, मारोती अंभोरे आदी उपस्थित होते.

छायाचित्र :अशोक वाटिकेत शुक्रवारी महापौर ज्योत्स्ना गवई यांनी महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.