आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील महाराणा प्रताप बागेत होणार संग्रहालय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-शहर कोतवाली चौकातील हिंदू सूर्य महाराणा प्रताप बाग कात टाकत आहे. या बगिचामध्ये लवकरच प्रेरणादायी संग्रहालय उभारण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज व महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्राचा या संग्रहालयात समावेश राहणार आहे.
स्थानिक आमदार निधीतून आमदार गोवर्धन शर्मा यांनी महाराणा प्रताप बागेच्या विकासासाठी सुमारे 50 लाख रुपयांची तरतूद केली. बगिचाच्या सौंदर्यीकरणाच्या कामाने आता गती घेतली आहे. सौंदर्यीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, आता बगिच्यात छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्राचा संग्रह या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. दोन्ही महापुरुषांच्या जीवन चरित्रांचे चित्रण, त्यांच्या शौर्य कथा, संस्कार, मुत्सदीपणा, राष्ट्रप्रेम याची सविस्तर माहिती संग्रहालयाचे विशेष आकर्षण राहणार आहे. तसेच लहान मुलांसाठी विरंगुळासाठी खेळ व इतर साहित्य लावण्यात येणार आहे.
कारंजे वाढवतील शोभा
महाराणा प्रताप बागेची शोभा विविध कारंजे वाढवणार आहे. या बगिचात शेगाव येथील आनंद सागरच्या धर्तीवर विविध प्रकारचे आकर्षक कारंजे लावण्यात येणार आहे. त्यामुळे बगिचाचे आकर्षण वाढणार आहे.
मातृशक्ती व कलावंतांचा सहभाग
महानगरातील विविध क्षेत्रांतील कार्यरत मातृशक्ती आणि कलावंतांच्या सहभागातून बगिचाचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे. अनेक कलावंतांनी दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करून संग्रहालयाची आखणी करण्यात आली. गोवर्धन शर्मा, आमदार, अकोला.