आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maharashtra Public Service Commission Exam Issue In Akola

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अकोल्यात ‘पीएसआय’च्या परीक्षेत केंद्राची अदलाबदली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी 25 ऑगस्टला पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा सकाळी 11 ते 12.30 या वेळेत घेण्यात आली. या कालावधीत ऐनवेळेवर विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र अदलाबदली झाल्याने परीक्षार्थींची एकच धावपळ उडाली. या प्रकारामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. जिल्ह्यातील पंधरा केंद्रांवर पीएसआयची पूर्व परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभागातर्फे राज्यात पोलिस उपनिरीक्षक पदाची पूर्व परीक्षा घेण्यात आली. अकोला जिल्ह्यात सुमारे तीन हजार 648 विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली. जिल्ह्यातील 15 परीक्षा केंद्रांवर पीएसआयची ही पूर्व परीक्षा घेण्यात आली. जिल्हा प्रशासनाने या परीक्षेसाठी 15 केंद्रप्रमुख नियुक्त केले होते. याशिवाय 43 पर्यवेक्षकआणि 199 समावेक्षक नियुक्त करण्यात आले होते. यासोबतच तीन समन्वयक अधिकारी नियुक्त करण्यात आले होते. या परीक्षा कालावधीत संबंधित परीक्षा केंद्रांवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या परीक्षेच्या व्यवस्थेवर जिल्हाधिकारी अरुण शिंदे हे लक्ष ठेवून होते.

याला जबाबदार कोण
25 ते 30 विद्यार्थ्यांचे ऐनवेळेवर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केंद्र बदलले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागली. काही विद्यार्थ्यांचा दहा ते पंधरा मिनिटे वेळ वाया गेला, याला जबाबदार कोण, असा प्रश्न या वेळी त्यांनी केला.

एसएमएसद्वारे दिली माहिती
अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेची माहिती एसएमएसद्वारे देण्यात आली होती. काही विद्यार्थ्यांनी ऑनलाइन परीक्षा केंद्राचे प्रवेशपत्र काढले नाही. ही चूक संबंधित विद्यार्थ्याची आहे.
- अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी अकोला.