आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Yojana Issue At Akola

कमिशनने कामांना खीळ, रोजगार हमी योजना बंद पडण्याच्या मार्गावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - गरजूमजुरांच्या हाताला काम मिळावे त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सुटावा या उदात्त हेतूने सुरू करण्यात आलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी याेजनेला दिल्ह्यात खीळ लागलेली दिसून येते. मजुरांच्या नावावर जेसीबीच्या साहाय्याने काम केले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
रोजगार हमी योजनेंतर्गत होणाऱ्या कामांवर जिल्ह्यातील विविध गावांमध्ये भर दिला जात आहे. प्रत्येक तालुक्याला रोजगार हमी योजनेंतर्गत स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जातो. अटी शर्तीच्या अधीन राहून हा खर्च करणे अपेक्षित आहे. पण तसे होत नाही त्यामुळे अर्धवट कामे पडत असल्याने शासनाच्या निधीचाही अपव्यय हाेत आहे. अकोला तालुक्यातील घुसर, दोनदसह अकोट तालुक्यातील पळसोद, पाटसूल येथील कामे आजही अर्धवट स्थितीत पडून आहेत.
अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी यंत्राच्या साहाय्याने कामे करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. मजुरांच्या हाताला काम मिळावे हा यामागील उद्देश आहे. तक्रार प्राप्त झाल्यास कारवाईचे आदेश राजूरकर यांनी दिले आहेत, अशी माहिती उपायुक्त अग्रवाल यांनी जिल्हा परिषदेत दिली.
शाखा अभियंता यांच्याकडून मस्टर जमा करण्यात दिरंगाई होत अाहे. त्यामुळे मजुरांना लवकर मजुरी मिळू शकत नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मस्टर जमा करावेत, असे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
योजनेचे उद्देश
*ग्रामीणक्षेत्रामध्ये प्रत्येक कुटुंबाला मागणीनुसार एका िवत्तीय वर्षात हमी िदलेल्या रोजगाराच्या स्वरूपात अकुशल अंगमेहनतीचे काम पुरवून त्याद्वारे िवहित दर्जाची िटकाऊ उत्पादकता निर्माण करणे.
*गोरगरिबांच्या उपजीविकेच्या संसाधनाचा पाया मजबूत करणे.
*सामाजिक सहभागाची सकारात्मक सुनिश्चिती करणे.
*ग्रामीण भागात पंचायतराज संस्था बळकट करणे.
कामे त्वरित मार्गी लावण्यास आढावा घ्यावा
अकोलाजिल्ह्यातील ग्रामीण भागात सुरु असलेली रोजगार हमी योजनेची कामे विहित वेळेत मार्गी लावावीत. जेणेकरून मजुरांच्याही हाताला काम मिळेल आणि गावाचाही विकास होईल. यासाठी प्रशासनाने आढावा घेण्याची गरज आहे.'' दीपिकाप्रशांत अढाऊ, जिल्हापरिषद सदस्य, मुंडगाव
जॉब कार्ड असलेले मजूर
*अकोला७४४०१
*अकोट ५६५३२
*बाळापूर ५१६५७
*बािर्शटाकळी ५१९३५
*मूर्तिजापूर ५४९०८
*तेल्हारा ४०४३५
*एकूण ३७९६५२
जिल्हािधकाऱ्यांकडे करा बनावट कामांची तक्रार
रोजगारहमी योजनेच्या कामात ग्रामीण भागात कुठेही गैरप्रकार होत असल्यास तत्काळ आपल्या विभागाच्या गटविकास अधिकारी, तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करावी. जेणेकरून प्रकार थांबवता येईल.'' प्रमोदसिंहदुबे, उपजिल्हािधकारी,रोजगार हमी योजना.