आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahatma Gandhi Rural Employment Guarantee Scheme

कट्यारमध्ये 10 वर्षांमध्ये 12 आत्महत्या, पात्र दोनच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- नापिकी कर्जबाजारीपणामुळे तालुक्यातील कट्यार येथे १० वर्षांमध्ये १२ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. महसूल प्रशासनाने मात्र, त्यापैकी केवळ दोघांच्या आत्महत्या पात्र ठरवल्याची व्यथा कट्यारच्या ग्रामस्थांनी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याजवळ मांडली.
डॉ. पाटील यांनी अकोला तालुक्यातील अनेक गावांना भेटी िदल्या. आज म्हैसांग येथे ते आले असता, कट्यारवासीयांनी त्यांच्याजवळ आपल्या समस्यांचा पाढा वाचला. कट्यार येथे पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या आहे. ग्रामस्थांना पूर्णेतील दूषित पाणी िपल्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा प्रशासनाला ही बाब माहिती असूनही मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी काहीही दखल घेण्यास तयार नाही. नागरिकांना स्वच्छ निर्मळ पाणी प्यावयास मिळावे, यासाठी जलशुद्धीकरण यंत्र बसवण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले. गावात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत रस्ते शेतरस्त्यांची कामे करावीत, त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना शेतीमधील अन्नधान्याची ने-आण करणे सोईचे होईल. तसेच गावांतर्गत िसमेंट क्राँकीट रस्तेसुद्धा करण्यात यावे, म्हैसांग ते दोनवाडा रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, कट्यार फाट्यावर हातपंप बसवण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. याप्रसंगी गोपाल ठाकरे, सचिन मूर्तडकर, प्रवीण ढोरे, सुभाष कडू, दीपक डाबेराव, रामसिंग सोळंके, ज्ञानेश्वर साबे, राजू डाबेराव, अंबादास वाहुरवाघ, गुलाबराव तेलगोटे, प्रल्हाद गावंडे, विशाल वक्टे आदी नागरिक उपस्थित होते. म्हैसांग येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित कट्यार येथील ग्रामस्थांनी पालकमंत्र्यासमोर समस्यांचा पाढा वाचला.