आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महायुतीमध्ये ऑल इज वेल : गोपीनाथ मुंडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- ‘महायुती अभेद्य आहे. कुठल्याही पक्षासोबत कुणाचेही मतभेद नाहीत. महायुतीमध्ये ऑल इज वेल आहे’, असे प्रतिपादन भाजपचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले. शुक्रवार, 14 मार्चला दुपारी 4.13 वाजता शिवणी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
खासदार गोपीनाथ मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे हे अमरावती येथे महायुतीच्या प्रचार सभेला जात असताना अकोला येथे विमानाने आले आणि नंतर ते मोटारीने अमरावतीकडे रवाना झाले. ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी सांगितले की, प्रसिद्धीमाध्यमेच त्यांना प्रसिद्धी देत आहेत. गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी विमानतळावर गर्दी केली होती.
खासदार संजय धोत्रे, आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार हरीश पिंपळे, आमदार डॉ. रणजित पाटील, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापालिकेचे विरोधी पक्षनेते हरीश आलीमचंदानी, नगरसेवक बाळ टाले, नगरसेवक अजय शर्मा आदींनी गोपीनाथ मुंडे आणि विनोद तावडे यांचे स्वागत केले.