आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Ready Of Maharashtra Vishansabha Electionin Vidharbha

इच्छुक पदाधिकारी लागले विधानसभा निवडणुकीच्या तयारीला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावराजा - ऑक्टोबर महिन्यादरम्यान विधानसभेची निवडणूक होण्याचे संकेत मिळताच सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार आतापासूनच तयारीला लागले आहेत. या इच्छुक उमेदवारांनी निवडक कार्यकर्त्यांद्वारे छुपा प्रचारही सुरु केला आहे.

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो. या मतदारसंघावर आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांचीच एकहाती सत्ता राहिली आहे. काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मताधिक्यात कमालीची घट झाली. आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी लोकसभेसाठी रा ष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट घेण्यास नकार दिल्यामुळे ते विधानसभेची निवडणूक लढणार हे निश्चित झाले होते. मात्र, आमदारकीची संधी इतर कार्यकर्त्यांना मिळावी या उद्देशाने आमदार डॉ. शिंगणे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्यास नकार दिल्यास सिंदखेडराजा मतदारसंघाचे रा ष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून डॉ. रामप्रसाद शेळके यांच्या नावाला प्रथम पसंती मिळू शकेल. कारण या मतदारसंघातील राजकारण आतापर्यंत एका समाजाभोवतीच राहिले आहे. त्यामुळे माजी आमदार तोताराम कायंदे यांनाही यावेळी उमेदवारीपासून डावलले जाण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने डॉ. शेळके कामाला लागले आहेत. निष्ठावान कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्यांनी छुपा प्रचारही सुरु केला आहे.
प्रत्येक विधानसभेच्या निवडणुकीत नेहमी एकच चेहरा समोर येत असल्यामुळे रा ष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी वाढू लागली आहे. या मतदारसंघाच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना व रा ष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच दुरंगी लढत राहिली आहे. आमदार डॉ. शिंगणे यांच्याशी शिवसेनेचे उमेदवार डॉ. शशीकांत खेडेकर यांनीच आतापर्यंत लढत दिली आहे. मात्र, त्यांना प्रत्येकवेळी पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, या वेळी चित्र वेगळे राहू शकेल. या वेळी शिवसेनेतर्फे डॉ. खेडेकर यांच्याऐवजी युवासेनेचे जिल्हाप्रमुख अमरदीप देशमुख यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यांनीही आतापासूनच मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे सुरु केले आहे. देशमुख शिवसेनेत येण्यापूर्वी छावा संघटनेत होते. त्यामुळे त्यांच्यासोबत युवकांची मोठी फळी आहे. शिवसेनेतही त्यांनी युवकांच्या मदतीने पक्षसंघटन मजबूत केले. अल्पावधीत केलेले पक्षकार्य पाहता शिवसेनेकडून त्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

या मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवाराचा आतापर्यंत पराभवच झाल्याने या वेळी हा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा, अशी मागणी भाजपाद्वारे केली जात आहे. या मागणीची दखल घेऊन हा मतदारसंघ भाजपला सुटल्यास या पक्षातर्फे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने डॉ. मांटेसुद्धा कामाला लागले आहेत.

या वेळी सिंदखेडराजा मतदारसंघ भाजपला देण्यात यावा, अशी मागणी या पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केली आहे. या मागणीचाही परिणाम या वेळी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मतदारसंघात उत्सुकता निर्माण झाली आहे.

शिवसेनेत बदल होण्याची चिन्हे
दरवेळी विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेकडून डॉ. शशिकांत खेडेकर यांना उमेदवारी मिळाली. यावेळी मात्र अमरदीप देशमुख यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते सुद्धा कामाला लागले आहेत.