आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्वांना अभिमान वाटण्याजोगा महाराष्ट्र घडवू - देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्यातीलजनतेला अभिमान वाटेल असा महाराष्ट्र घडवू, अशी ग्वाही देतानाच महायुतीच्या सरकारने शंभर दिवसांमध्ये आघाडी सरकारच्या काळात खालावलेली राज्यातील स्थिती सुधारण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

अकोला, वाशीम जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. महसूलमंत्री एकनाथराव खडसे, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे, आमदार चैनसुख संचेती, महापौर उज्ज्वलाताई देशमुख, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगर अध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे व्यासपीठावर होते.

राज्यात महायुतीच्या सरकारने १०० दिवसांच्या काळात गतिमान शासन देण्याचा प्रयत्न केला. सेवा हमी विधेयक हाही त्याचाच भाग आहे. जे अधिकारी जनतेची कामे करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई होईल, असा कायदा अस्तित्वात येणार आहे. सरकार लोकाभिमुख व्हावे, असा प्रयत्न आहे. आघाडी शासनाच्या १५ वर्षांच्या कुशासनानंतर राज्यातील स्थिती सुधारायला वेळ लागणार आहे. राज्याच्या तिजोरीत पैसा नाही, यातून मार्ग काढत आहोत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

डॉ. रणजित पाटील यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून अकोला, वाशीम जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होईल, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. आरंभी, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचा जाहीर कार्यक्रमात सहभागी होण्याचा पहिलाच अकोला दौरा असल्याने कार्यकर्त्यांत उत्साह होता. जठारपेठ चौकात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. होलीक्रॉसमोरच्या कार्यालयाजवळ सकाळी उत्साही वातावरण होते. तुता-यांचा निनाद होत होता. माजी आमदार भय्यासाहेब पाटील, महानगर सरचिटणीस डॉ. युवराज देशमुख, दीपक मायी, विजय अग्रवाल, धनंजय गिरधर, अॅड, गिरीश गोखले, नगरसेवक आशिष पवित्रकार, राहुल देशमुख, माजी महापौर सुमनताई गावंडे, महिला आघाडी अध्यक्ष आरती लढ्ढा, नारायण पंचभाई, चंदा ठाकूर, रश्मी जोशी, जगदीश मुुरुमकार, माणिकराव नालट, रतनलाल खंडेलवाल, मनोज तायडे, प्रशांत गावंडे, नंदकिशोर त्रिवाड, अशोक नागदेवे, डी. गोपनारायण, उकंडराव सोनोने यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बाजूला महसूलमंत्री एकनाथराव खडसे, डॉ. पाटील आदी.

मुख्यमंत्र्यांना ११ लाखांचा धनादेश
डॉ.रणजित पाटील नागरी सत्कार समितीकडून ११ लाख ८७ हजाराचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीसाठी देण्यात आला. गोपाल खंडेलवाल, डॉ. गजानन नारे यांच्या मार्गदर्शनात निधी संकलित करण्यात आला होता. निधी प्रदान करताना सचिन कोकाटे, राम मुळे, अभय बिजवे, आशिष पवित्रकार उपस्थित होते.