आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malpractice In Security Dividents, Agitation Before Supply Office

सुरक्षा लाभार्थी यादीत घोळ, पुरवठा कार्यालयावर ठिय्या आंदोलन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - स्वस्त धान्य दुकानदारांकडून अन्न सुरक्षा योजनेच्या यादीत नावे समाविष्ट करून घेण्यासाठी प्रतिलाभार्थी 500 रुपयांची मागणी होत असल्याचा आरोप करत शहरातील हरिहरपेठ भागातील जवळपास 200 लाभार्थ्यांनी 11 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी 11.30 वाजता ठिय्या आंदोलन केले.शहरातील हरिहरपेठेतील जवळपास 200 लाभार्थ्यांना अन्न सुरक्षा योजनेच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे हे लाभार्थी शासनाच्या लाभापासून वंचित आहेत. यादीत नाव समाविष्ट करायचे असेल, तर 500 रुपये द्या, अशी मागणी संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडून केली जात आहे,असा आरोप लाभार्थ्यांनी केला.हरिहरपेठेतील महिला-पुरुष सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात एकत्र आले. तेथे त्यांनी पुरवठा विभागाविरोधात निदर्शने करून स्वस्त धान्य दुकानदार अनधिकृत मागणी करत असल्याचा आरोप केल्याने उपस्थित पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांसह सर्वजण अवाक् झाले.
शिवसैनिकांची धाव : हरिहरपेठेतील नागरिक पुरवठा विभागासमोर ठिय्या देत असल्याची माहिती मिळताच शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख राजेश मिश्रा, शहरप्रमुख तरुण बगेरे, किरण ठाकूर, योगेश अग्रवाल, , गजानन चव्हाण, विलास अनासने, गजानन घुसे, नगरसेवक शरद तुरकर, नगरसेविका देवर्शी ठाकरे, मंजूषा शेळके, सुभाष वर्मा यांनी तिथे धाव घेतली.

अन्न सुरक्षा यादीमध्ये नावे समाविष्ट करून घेण्यासाठी हरिहरपेठेतील नागरिकांनी जिल्हा पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर मंगळवारी ठिय्या आंदोलन केले.

शहरामधील गोरगरीब जनतेला न्याय मिळाला पाहिजे. तयार केलेली यादी चुकीची असून, ती दुरुस्ती व्हावी. लाभार्थ्यांवरील अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. राजेश मिश्रा, उपजिल्हाप्रमुख, शिवसेना, अकोला.

यादी दुरुस्त करावी
बुलबुलेंवर निलंबनाची कारवाई व्हावी : अन्न सुरक्षा योजनेची चुकीची यादी तयार करण्यात दोषी असलेले पुरवठा नियंत्रक दीपक बुलबुले यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे.

जिल्हाधिकार्‍यांसोबत चर्चा
या समस्येबाबत शिवसेनेचे उपप्रमुख राजेश मिश्रा, शहरप्रमुख तरुण बगेरे, नगरसेवक शरद तुरकर, देवश्री ठाकरे, मंजूषा शेळके यांनी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्यासोबत चर्चा क रून समस्या सोडवण्याची विनंती केली.