आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुकीची लगीनघाई; माणिकरावांची आज कार्यकर्त्यांशी गळाभेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्रस - दारव्हा मतदारसंघांवरील पकड ढिली झाल्याने प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी आता आपले लक्ष यवतमाळ मतदारसंघावर केंद्रित केली आहे. त्यांचे पुत्र राहुल ठाकरे यांना यवतमाळातून उमेदवारी देण्यासाठी माणिकराव स्वत: प्रयत्न करीत असल्याची माहिती आहे. दरम्यान, रविवारी (दि. २४) माणिकराव यवतमाळात येत असून, ते दविसभर कार्यकर्त्यांची गळाभेटी घेणार असल्याने सर्वच राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहे.
यवतमाळ विधानसभा मतदारसंघात नीलेश पारवेकर यांच्या आकस्मिक निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी नंदनी पारवेकर विजयी झाल्या.मात्र, त्या मतदारसंघात पाहिजे तसा प्रभाव पाडू शकल्या नाही. नेमका याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. पक्षश्रेष्ठींसुद्धा विद्यमान आमदाराला डावलून दुसरा उमेदवार देणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे राहुल ठाकरे, बाळासाहेब मांगुळकर, जीवन पाटील, सीमा तेलंगे, संध्या सव्वालाखे यांच्यासह अनेकांनी यवतमाळवर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठीच माणिकराव ठाकरे यवतमाळात मुक्कामी येत असल्याने अनेकांच्या नजरा त्यांच्याकडे खिळल्या आहेत.
यवतमाळात काँग्रेस-राष्ट्रवादीचा वाद
यवतमाळ हा आघाडीत काँग्रेसला सुटला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार संदीप बाजोरिया यांनी या ठिकाणी निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थीला प्रचाराचा नारळ फोडणार असल्याचे ते सांगत आहेत. यवतमाळातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये हे वितुष्ट वाढल्यास अधिकृत उमेदवाराला याचा फटका बसू शकतो.
सायंकाळपर्यंत भूमिपूजनाचा सपाटा
ये त्या २५ किंवा २६ ऑगस्टपर्यंत आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने राजकीय नेत्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत भूमिपूजनाचा एकाच सपाटा सुरू केला आहे. जिल्ह्यात सर्वच पक्षांचे आमदार निधीची चिंता न करता भूमिपूजन करण्याच्या मागे लागले आहेत. एकाच दविशी आठ ते दहा ठिकाणी कार्यक्रम ठेवले जात आहेत. जसे राजकीय नेते धावपळ करीत आहे तसेच नागरिकसुद्धा नेमक्या याच संधीचा फायदा घेत काम पूर्ण करून घेण्यासाठी उपोषण, मोर्चा काढून नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करीत आहेत. आचारसंहितेच्या धाकाने जिल्हाभर नेत्यांची आणि नागरिकांची धावपळ सुरू झाली आहे. रोज कुठे ना कुठे मोर्चे निघत आहेत. शुक्रवारी जिल्हा कचेरीवर तीन मोर्चे धडकले होते.लोकांचा रोष नको म्हणून नेतेमंडळी खोटी आश्वासने देऊन वेळ मारून नेत आहेत.
शिवसेनेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भाजपमध्ये नाराजी
यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला सातपैकी चार मतदारसंघ वाट्याला आले आहेत. शिवसेना मात्र आपल्याला जिल्ह्यातील चार मतदारसंघ पाहिजे असा दबाव निर्माण करीत आहेत. यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त असल्याचे सांगत वरिष्ठ स्तरापर्यंत येथील उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहे. भाजप मात्र कुठल्याच परििस्थतीत तडजोड करायला तयार नाही. शिवसेनेच्या एकाही मतदारसंघात भाजप हस्तक्षेप करीत नाही, मग शिवसेनेचे पदाधिकारी यवतमाळ मतदार संघात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत असल्याने भाजपचे पदाधिकारी उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.
मनसे पदाधिकारी ‘राज’दरबारी
विदर्भातील मतदारसंघात किती जागा लढवायच्या, याची चाचपणी करण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे तीन दविसांच्या मुक्कामी नागपूर येथे येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्हयातील सातपैकी किती जागांवर मनसे उमेदवारी देणार, हेसुद्धा लवकरच स्पष्ट होणार आहे. राज यांचे आदेश येताच यवतमाळ येथील आनंद एंबडवार, अशोक पुरी, राजू उंबरकर यांच्यासह सर्वच पदाधिकारी रेकॉर्ड गोळा करण्याच्या मागे लागले आहेत. तूर्तास यवतमाळ येथे आनंद एंबडवार, अशोक पुरी, वणी येथे राजू उंबरकर, योगिता काळे, तसेच उमरखेड येथे मनोज भगत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे. उर्वरित ठिकाणीसुद्धा अनेक जण निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. जिल्ह्यात वणी वगळता इतर ठिकाणी मनसे सशक्त नाही. असे असले तरी राज ठाकरे ह जिल्ह्यातील उमेदवारीबाबत नेमकी काय भूमिका घेतात, यावरच पुढील राजकारणाची दिशा ठरणार आहे. जिल्ह्यातील एक मतदारसंघ सोडल्यास इतर ठिकाणी निवडून येण्याची मनसेची ताकद नसली, तरी समोरच्या उमेदवाराला पराभूत करू शकते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे भाजपमध्ये नाराजी
यवतमाळ जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाला सातपैकी चार मतदारसंघ वाट्याला आले आहेत. शिवसेना मात्र आपल्याला जिल्ह्यातील चार मतदारसंघ पाहिजे असा दबाव निर्माण करीत आहेत. यवतमाळ मतदारसंघात शिवसेनेची ताकद जास्त असल्याचे सांगत वरिष्ठ स्तरापर्यंत येथील उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात आहे. भाजप मात्र कुठल्याच परििस्थतीत तडजोड करायला तयार नाही. शिवसेनेच्या एकाही मतदारसंघात भाजप हस्तक्षेप करीत नाही, मग शिवसेनेचे पदाधिकारी यवतमाळ मतदार संघात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करीत असल्याने भाजपचे पदाधिकारी उघड नाराजी व्यक्त करीत आहेत.