आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाच्या ‘विचारां’चा विजय करा : माणिकराव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- शिवसेना-भाजपचे लोक लबाड आणि खोटे आहेत, त्यांना ओळखा. या देशाला स्थिर ठेवण्याची गरज आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या विचारांचा विजय करण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रयत्न करावे लागतील, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. येथील स्वराज्य भवनाच्या प्रांगणात काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या पदग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. भविष्यात काय घडामोडी होतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

खोट्या प्रचाराला उत्तर द्यावे
भाजपच्या खोट्या प्रचाराला पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सडेतोड उत्तर द्यावे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सर्व योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्यासाठी काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवाराला विजयी करा.’’ मदन भरगड, शहर अध्यक्ष, काँग्रेस

‘आरपीआय’मुळे ग्रहण
आरपीआयमुळे या जिल्हय़ाला कसे ग्रहण लागले, हे सर्वांना माहीत आहे. त्यातून मुक्ती साठी काँग्रेसमधील कार्यकर्ते, नेत्यांनी साथ द्यावी. जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या नेतृत्वात काँग्रेसला समोर न्यायचे आहे. बाबाराव विखे, माजी जिल्हाध्यक्ष, काँग्रेस

शंभर टक्के विजयी करू
लोकसभेसाठी काँग्रेसचा उमेदवार दिल्यास त्यास विजयी करू. काँग्रेसमध्ये आलेल्या मखराम पवार, नारायण गव्हाणकरांमुळे बंजारा व कुणबी समाजात उत्साहाचे वातावरण आहे.’’ सुधाकर गणगणे, प्रदेश उपाध्यक्ष, काँग्रेस.

सगळ्या जागा जिंकू
मंचावर बसलेले सर्व नेते मंडळी निवडणुकीच्या कामाला लागली तर लोकसभा व विधानसभेच्या सर्व जागा जिंकू. पण, ते काय काम करतात, हे सगळ्यांना वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.’’ बाबासाहेब धाबेकर, माजी मंत्री व ज्येष्ठ काँग्रेस

.अन्यथा राजीनामा द्या
पक्षाच्या व्यासपीठावर सर्व आजी, माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना चांगले काम करण्याची समान संधी उपलब्ध आहे. ज्यांची काम करण्याची इच्छा आहे त्यांनी चांगले काम करावे, ज्यांची काम करण्याची इच्छा नाही, अशा पदाधिकार्‍यांनी पक्षाचा राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या आशीर्वादावर भारिप-बमसंचे नेते खासदार झाले. दलित समाजातील नेत्यांनी राजकारणात योग्य दिशेने जावे, त्यांनी काँग्रेस पक्षासोबत राहावे. प्रदेशाध्यक्षांनी जिल्हय़ातील समस्या सोडवण्यासाठी पालकमंत्र्यांना आदेश द्यावा.’’ हिदायत पटेल, नवनियुक्त जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.