आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mansoon News In Akola, Divya Marathi Monsoon News In Akola, Divya Marathi

बाजारपेठेत रेनकोट, छत्री खरेदीसाठी गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - पावसापासून बचावासाठी छत्री, रेनकोट खरेदीसाठी येथील बाजारपेठेत नागरिकांची लगबग दिसून येत आहे. अनेकांनी आपले जुने रेनकोट, छत्री बाहेर काढले आहे, तर नवीन छत्री, रेनकोट खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांनी गर्दी केली आहे.

किरकोळ व्यावसायिकांना पावसापासून संरक्षण देण्यासाठी रंगीबेरंगी ताडपत्री, मोटारसायकलचे सीट कव्हरही विक्रीला आले आहेत. यंदा बाजारपेठेत लहान मुलांना आकर्षित करणारे रेनकोट व छत्री तसेच स्त्रियांसाठी विविध डिझाइनचे आकर्षक प्रिंटेड रेनकोट विक्रीला आले आहेत. यामध्ये नायलॉन, साधे प्लास्टिक, प्रिंट प्लास्टिक आदी प्रकारचे रेनकोट उपलब्ध आहेत. प्लास्टिकची ताडपत्री 50 ते 60 रुपये मीटरप्रमाणे विकल्या जात आहे.
यंदा 10 टक्क्यांनीभाववाढ
यंदा स्त्रियांसाठी खास तीन फोल्डची छत्री बाजारपेठेत आली आहे, तर अँग्री बर्ड्स, स्पायडरमॅन, छोटा भीम आदी काटरून्सने नटलेल्या रेनकोट व छत्रीमुळे बच्चे कंपनी आकर्षित होत आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा 10 टक्क्यांनी भाववाढ झाली आहे.’’ दिलीप शहा, व्यावसायिक