आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला लागली गळती दादांनी घेतली बाबासाहेब धाबेकरांची भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला गळती लागली आहे. त्यामुळे पक्षाला मोठा धक्का बसत आहे. इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसला अधिक गळती लागली. एक एक नेता काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षात जात असल्याने हा सर्व प्रकार उघडकीस येत आहे.
महापालिका निवडणुकीत शहरात ज्यांनी काँग्रेस संख्यात्मकदृष्ट्या वाढवली त्यांना तिकीट देणे काँग्रेससाठी अकोला (पश्चिम) मध्ये चांगलेच महागात पडले, हा पहिला धक्का, तर दुसरा धक्का काँग्रेस नेते प्रदेश सचिव उदय देशमुख यांनी दिला. उदय देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसमधून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी महापौर सुरेश पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा तिसरा महत्त्वाचा धक्का आज पक्षाला बसला.

काँग्रेसचे इतर नेते, कार्यकर्ते पदाधिकारी हे पक्षात चांगलेच नाराज आहे तसेच काँग्रेस सोडून राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट आणण्यासाठी गेलेले ते मिळाले असताना केवळ मुस्लिम उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादीने प्रकाश तायडे यांना थांबण्याचा सल्ला दिला. म्हणजे तेदेखील काँग्रेसमध्ये सुखी नव्हते आता ते निष्ठेने काम करत आहेत. याशिवाय काँग्रेसमध्ये स्थानिक काही नगरसेवक खुलेआमपणे राष्ट्रवादीचा प्रचार करत आहेत. यातच पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचे स्पष्ट होते. अशा परिस्थितीत आता काँग्रेसजवळ शिल्लक राहिले कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

भाजपमधून काँग्रेसमध्ये गेलेले कुठलेही आश्वासन पूर्ण झालेले माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनीदेखील पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ते आता अपक्ष उमेदवार म्हणून लढत आहे. काँग्रेसने त्यांना लोकसभेत आता विधानसभेत हात दाखवला. अशा परिस्थितीत जिल्ह्यात काँग्रेसची शकले उडाल्याचे सर्वत्र चित्र आहे. या परिस्थितीत पक्षात जबाबदार कोण, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुधाकर गणगणे राहतात. त्यांनी त्यांच्या मुलासाठी अकोट येथून तिकीट आणले, पण जिल्ह्यातील इतर नेत्यांचे काय, असा प्रश्न पडला आहे. काँग्रेसमध्ये असलेल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये नतिकोद्दीन खतीब डॉ. सुभाषचंद्र कोरपे यांनी अकोला पूर्वसाठी स्वबळावर तिकीट आणले. मूर्तिजापूर येथे काँग्रेसने गेल्या अनेक वर्षांपूर्वी भारिप सोडत काँग्रेसवासी झालेल्या श्रावण इंगळे यांना तिकीट दिले. याविरोधात दीपक माने यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल महानगराध्यक्ष मदन भरगड यांच्यावर या गळतीची किती जबाबदारी, असा प्रश्न कार्यकर्ते करत आहेत.

इमर्जन्सी के बाद भी लोग छोड गये थे
लोकांच्याइकडून तिकडून उड्या मारणे सुरू आहे. काँग्रेसमध्ये आज, भारिप शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री (पृथ्वीराज चव्हाण) यांच्या उपस्थितीत तेल्हारा येथे प्रवेश केला. ७० च्या दशकात इमर्जन्सीनंतर तसेच इंदिरा गांधी यांच्या पराजयानंतर अनेक मोठे नेते काँग्रेस सोडून गेले. पण, त्यानंतर काँग्रेस मोठ्या सशक्तपणे उभी राहिली. या वेळी विदर्भात काँग्रेसला मोठा विजय प्राप्त होईल, येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष काँग्रेस राहील. हिदायतपटेल, जिल्हाध्यक्ष,काँग्रेस, अकोला.