आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरक्षणाचा जल्लोष; धिंग्रा चौकात फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे मराठा महासंघाच्या वतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. मदनलाल धिंग्रा चौकात फटाक्यांची आतषबाजी करत सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.
मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनायक पवार यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व मराठा आरक्षण समितीचे अध्यक्ष नारायण राणे यांचे आभार मानले. मागील 15 वर्षांपासून मराठा महासंघाच्या लढ्याला मिळालेले हे यश असल्याचे मान्यवरांनी सांगितले. या वेळी महासंघाचे उपाध्यक्ष विनायक पवार, जिल्हाध्यक्ष योगेश थोरात, श्रीकांत फाले, युवक जिल्हाध्यक्ष अंशुमन देशमुख, शरद पवार, सुधीर गांभुळे, श्रीकृष्ण गावंडे, शुभम धिमे, रमेश बुडूकले, डॉ. संजय धोत्रे, संदीप भुंबरे, पंकज काळे, गणेश विधोट, निखिल बाठे, मयूर चिकटे, सुरेश पाटील, रोशन ठोसर, अक्षय भालतिलक, रंजित काळे, नीलेश तळोकार, नितीन वाणी, शैलेश गोरे, जयंत सोनवणे, तुषार वाघमारे, जयेश घाटोळ, अशोक मुळे, अनुप गायकवाड, बबन मोरे, विशाल बकाल, दत्ता पाकधने, संजय सूर्यवंशी आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येत
उपस्थित होते.

दरम्यान, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम तायडे यांनी मागणीनुसार मराठा समाजाला शासनाने आरक्षण जाहीर केले नाही, अशी भावना व्यक्त केली. शासनाने मराठा समाजाच्या मागणीचा जरा तरी विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रीया तायडे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलतांना व्यक्त केली.
पदाधिकार्‍यांनी व्यक्त केल्या संमिश्र प्रतिक्रिया

निर्णय उशिराने घेण्यात आला
शासनाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आरक्षणासाठी मराठा समाजाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात आला होता, त्या वेळीच मागणी मान्य होईल, असे वाटले होते. मात्र, निर्णय उशिराने घेण्यात आला.’’
राम मुळे , मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष
पवार, मुख्यमंत्र्यांचे आभार
समाजाची आर्थिक स्थिती पाहता आरक्षण देणे गरजेचे होते. राकाँकडून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही हा विषय सातत्याने लावून धरला होता. शासनाने घेतलेल्या निर्णयाबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री यांचे आभार मानतो.’’
श्रीकांत पिसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
निर्णय सर्वांसाठी हितकारक
४मुस्लिम समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाबद्दल समाधान आहे. कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाचे स्वागत आहे. मुस्लिम समाजातील गरजू वर्गाला या आरक्षणामुळे नक्कीच लाभ होईल. त्यामुळे सरकारने घेतलेला निर्णय सर्वांसाठी हितकारक आहे.’’
अझहर हुसेन, माजी मंत्री
लॉलिपॉपसारखा निर्णय
४शासनाचा निर्णय लॉलिपॉपसारखा वाटतो. कारण या निर्णयाला संवैधानिक आधार नाही. आंध्र प्रदेशातही मुस्लिम समाजासाठी आरक्षण जाहीर झाले होते. परंतु, त्याचा काहीच फायदा झाला नाही. लोकसंख्येनुसार 9 टक्के आरक्षणाची गरज असताना 5 टक्के जाहीर करणे हा समाजावर अन्याय आहे.’’
मुफ्ती अशफाक, प्रदेश उपाध्यक्ष, यूडीएफ
(फोटो - मराठा महासंघाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.)