आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maratha Reservation Demand From Shivsangram Sanghatana

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घोडे, बकर्‍यांची वरात काढून केला निषेध; मराठा आरक्षणासाठी शिवसंग्राम संघटना रस्त्यावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - मराठा आरक्षण जाहीर करावे, या मागणीसाठी शिवसंग्राम संघटना रस्त्यावर उतरली आहे. घोडे व बकर्‍या घेऊन शासनाचा निषेध करीत शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी 23 जून रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत वरात काढली.
मराठा समाजाची परिस्थिती पाहता नोकरी व शिक्षणात आरक्षण काळाची गरज आहे.
त्यामुळे शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. 21 जून रोजी मराठा आरक्षण जाहीर करू, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र, 23 जून उलटूनही कोणत्याही प्रकारची कार्यवाही मराठा आरक्षणाबाबत झालेली नाही. शासनाने दिलेले आश्वासन म्हणजे ‘उल्लू बनाविंग’चा प्रकार होय, असा आरोप शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या आंदोलनात सुनील खिरकर, राम इंगळे, सुजित कुºहे, मंगेश सावरकर, मनोज ताथोड, विशाल खारोडे, सागर मोहोड, सुमेंद्र तायडे, पवन मेतकर, विठ्ठल पाटील, किरण देशमुख, अमोल इटखेडे, मंगेश देशमुख, संजय मोहोड आदींनी सहभाग घेतला.
शासनाचा उल्लू बनाविंग कार्यक्रम
४केवळ आश्वासनांची खैरात मराठा समाजाला मिळत आहे. शासन मराठा आरक्षणाबाबत गंभीर नसल्याचे दिसते. शासनाचा हा केवळ उल्लू बनाविंग कार्यक्रम होय.’’
शिवा मोहोड, जिल्हाध्यक्ष, शिवसंग्राम संघटना, अकोला.
छायाचित्र - जिल्हाधिकारी कार्यालयावर घोडा, बकर्‍या घेऊन आलेले शिवसंग्रामचे कार्यकर्ते.