आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marginal Farmers Will Receive Free Seeds Tomorrow

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्पभूधारक शेतकऱ्यांना उद्या मिळणार मोफत बियाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- आर्थिक संकटात सापडलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांना जिल्हा परिषद कृषी विभागाच्या वतीने मोफत बियाणे वाटप करण्यात येत आहे. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या शुभहस्ते हा सोहळा जून रोजी जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू महाराज सभागृहात सकाळी १०.३० वाजता पार पडत आहे.
मुलांचे शिक्षण, मुलामुलींचे लग्न करण्यासाठी अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून कर्ज घेऊन आपली तात्पुरती गरज भागवली आहे. त्यात आता खरिपाचा पेरा कसा करायचा, हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांना पेरणीची किमान सुविधा तरी उपलब्ध व्हावी, या उद्देशाने शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्याची सूचना मांडली. भारिप बहुजन महासंघाच्या सदस्यांनी हा प्रश्न सभागृहात रेटून धरला.
सुदैवाने सर्व सदस्यांनी या योजनेला पाठिंबाही दिला. सेसफंडातून ३० लक्ष रुपयांची तरतूदही झाली. या पैशातून अल्पभूधारक शेतकऱ्यांना मोफत बियाणे देण्याचे िनयोजन झाले आहे. या सोहळ्याला बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार, माजी आमदार हरिदास भदे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवेंदर सिंग, उपाध्यक्ष गुलाम हुसेन गुलाम नबी देशमुख, कृषी पशुसंवर्धन समिती सभापती रामदास मालवे, महिला बालकल्याण समिती सभापती द्रौपदाबाई वाहोकार, समाजकल्याण सभापती गोदावरीताई जाधव, अर्थ आरोग्य समिती सभापती राधिकाताई धाबेकर, भाजपविरोधी पक्ष नेता रमण जैन, भारिप-बमसं गटनेते विजयकुमार लव्हाळे, काँग्रेस गटनेते डाॅ. हिंमतराव घाटोळ, राष्ट्रवादी गटनेते पुंडलिकराव अरबट, शिवसेना गटनेत्या ज्योत्स्नाताई चोरे यांची प्रमुख उपस्थिती राहील. या सोहळ्यात प्रातिनिधिक स्वरूपात २० शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप होईल. या वेळी समस्त शेतकरी बांधव, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शरद गवई यांनी केले आहे.
देशात पहिला उपक्रम
पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थापैकी अकोला जिल्हा परिषद हा उपक्रम राबवत आहे. गेल्या १५ वर्षांपासून सत्तेत असलेल्या भारिप बहुजन महासंघाच्या सत्तेने मागासवर्गीय लाभार्थी गट, महिला, शेतकरी विद्यार्थी यांना प्राधान्य देत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे आर्थिक दुर्बल घटकाच्या उन्नतीसाठी भारिप बहुजन महासंघ गटबंधन सदैव प्रयत्नशील राहील.
बियाणे वाटप कार्यक्रम
तालुका दिनांक स्थळ
अकोटजून 4 जून पंचायत समिती सभागृह
तेल्हारा 5 जून पंचायत समिती सभागृह
मूर्तिजापूर 6 जून पंचायत समिती सभागृह
अकोला 8 जून पंचायत समिती सभागृह
बाळापूर 9 जून पंचायत समिती सभागृह
पातूर १०जून पंचायत समिती सभागृह
बार्शिटाकळी ११ जून पंचायत समिती सभागृह