आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marks For Finally Incorrect Questions CBSE Decision

चुकीच्या प्रश्नांचेही गुण, अखेर सीबीएसईने घेतला निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जेईई मेन्समध्येचार गुणांसाठी विचारलेल्या चुकीच्या प्रश्नासाठी उमेदवारांना पूर्ण गुण देण्याचा निर्णय सीबीएसईने घेतला आहे. २७ एप्रिल रोजी ऑनलाइन निकाल जाहीर केला जाणार आहे. जेईई मेन्ससाठी देशभरातून १३ लाख विद्यार्थी बसले होते. िफजिक्सच्या पेपरमध्ये एका प्रश्नाचे चारही पर्याय चुकीचे होते. तर दुसऱ्या प्रश्नाच्या उत्तराचे दोन पर्याय बरोबर होते.

ज्यांनी दोन्हीपैकी एक पर्याय लिहिला, त्यांना या प्रश्नाचे गुण मिळतील. मात्र, ज्या प्रश्नाच्या उत्तराचे चारही पर्याय चुकले आहेत, त्याचेच चार गुण दिले जाणार आहेत.