आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marriage News In Marathi, Bride Run Another People Issue At Akola, Divya Marathi

मेंदी सुकण्यापूर्वीच नववधूने काढला पळ!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - साधारणत: महिनाभरापूर्वी सनई चौघड्यांच्या मंजूळ स्वरात विधिवत लग्न झाले. नवरदेव-नवरीच्या तळहातावर आकर्षक मेंदीही काढली गेली. दारात मांडव सजला. लग्न मंडपाला रंगीबिरंगी आकर्षक स्वागत कमानी लावल्या गेल्या. सगळीकडं अत्तराचा सुवास दरवळत होता. दोघांनीही विधिवत एकमेकांना ‘स्वीकारले.’ आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या. पण, लग्नानंतर मेंदी सुकण्यापूर्वी अवघ्या एका महिन्यातच नववधूने पळ काढला. ही घटना शहरातील एका मोहोल्ल्यात घडली.
तहसील ठिकाण असलेल्या एका गावातील 19 वर्षीय युवतीबरोबर शहरातील एका 22 वर्षीय युवकाचे लग्न ठरले. लग्नापूर्वी दोघेही तासन्तास भ्रमणध्वनीवरून एकमेकांच्या संपर्कात राहत होते.जस-जशी लग्नाची तारीख जवळ येत होती तस-तशी दोघांचीही झोप उडाली. पण, तिची झोप उडण्यामागे वेगळेच कारण होते. याची झोप मात्र तिच्या गोड स्वप्नाने उडाली होती. एकदाचे मित्र-मंडळी, नातेवाईक, समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या साक्षीने दोघेही लग्न बंधनात अडकले. दोनच दिवसांत वधूला माहेरी परत पाठवण्याचे ठरले. आता आपल्या ‘जान’चा विरह सहन करावा लागणार म्हणून इकडे हाही दु:खी झाला. पण, रीतीरिवाजाप्रमाणे परत पाठवणे आवश्यक होते आणि प्रश्न केवळ चार ते पाचच दिवसांचा होता. त्यामुळे त्याने काळजावर दगड ठेवून तिला पाठवले.
ती परत आल्यानंतर आपले नवे आयुष्य कसे असेल याची स्वप्नं रंगवण्यात तो मुश्गुल झाला. माहेरहून ती परत आलीसुद्धा. पण, वेगळेच काही ठरवून. ‘मांडव ते परतणी’ या प्रवासात तिनं अनेक दिव्य पेलले. परत आल्यानंतर ती काही दिवस गुण्यागोविंदाने आपल्या सासरी राहिली. पण, एक दिवस जवळच्या नातलगाचे लग्न असल्याने आपल्याला लग्नाच्या पूर्व दिवशी मदतीसाठी जावे लागणार आहे, असे तिने सांगितले. तिच्या मधाळ बोलण्यावर कुणी हरकत घेतली नाही. बॅगमध्ये आपले सगळे कपडे पॅक करून तीन दिवसांपूर्वी लग्नासाठी म्हणून ती घरून गेली ते परत आली नाहीच.
संस्कारच हरवले : आपली बायको हरवली आहे, अशी तक्रार तिच्या पतीने दिली. पण, तिची एकूणच वागणूक पाहता आणि लग्नापूर्वी तिने सोबत नेलेल्या कपड्यावरून ती नव्हे, तर तिच्यावरील संस्कारच हरवले आहे, अशी प्रचिती त्याला आली आहे. जगातील सर्वच संस्कृतीत लग्नाला अत्यंत पवित्र मानले जाते. 16 संस्कारांपैकी लग्न हा संस्कारसुद्धा महत्त्वाचा मानला जाते. पण, या संस्काराचा विसर काहींना पडत असल्याचे यातून दिसत आहे.
शहरातील घटना