आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतीला दारुसाठी पैसे देणार्‍या मित्रांना शरीरसुख नाकारले, विवाहितेस पेटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोट - पत्नीला खासगी मालमत्ता समजण्याची प्रवृत्ती एकविसाव्या शतकातही कायम असल्याचा प्रत्यय अकोटवासीयांना आला. येथील किशोर काकड या दारुड्या असलेल्या नराधमाने आपल्या व्यसनाची पूर्तता करणाऱ्या दोन मित्रांची लैंगिक भूक भागवण्याचा "आदेश' पत्नीला दिला. मात्र, तिने नकार दिल्यामुळे पतीने मित्रांच्या मदतीने तिला जिवंत पेटवून दिल्याची घटना २९ जूनच्या रात्री घडली.

त्या रात्री पीडित महिला आपल्या दीड वर्षांच्या चिमुकल्यासोबत घरी एकटीच होती. पीडितेचा पती मजुरी करतो. त्याला दारूचे व्यसन आहे. रात्री वाजताच्या सुमारास तिचा पती आणि त्याचे दोन मित्र संतोष मोरे रामसिंग हे घरी आले. ते दारू पिऊन होते. त्यामुळे झोपण्यासाठी ती दुसऱ्या खोलीत निघाली. मात्र, किशाेरच्या मित्रांनी या २५ वर्षीय विवाहितेसोबत लैंगिक संबंध स्थापन करण्याची इच्छा व्यक्त केली. महिलेने स्पष्ट नकार देऊन ही बाब पतीला सांगितली. मात्र, पतीनेसुद्धा तिला मित्रांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यास सांगितले. त्यानंतर तिने कडक शब्दांत पतीला फटकारले. त्यामुळे चवताळलेल्या या तिघांनीही तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत पेटवून दिले. यामध्ये ही महिला ८३ टक्के भाजली. शेजारच्यांनी तिला सर्वप्रथम अकोटच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला अकोला येथील सर्वोपचारमध्ये हलवण्यात आले. सध्या ती मृत्यूशी झुंज देत आहे. तिचा मृत्यूपूर्व जबाब, वैद्यकीय अहवालावरून अकोट शहर पोलिसांनी जुलै रोजी पीडित महिलेचा पती किशोर काकड संतोष मोर, रामसिंग यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३५४, नुसार गुन्हा नोंदवला. किशोर काकडला पाेलिसांनी आज अटक केली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक पी. एच. मानलवी करत आहेत.

पेटवल्यानंतर तिघेही झाले फरार
पतीनेमित्रांच्या मदतीने विवाहितेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवले तेथून फरार झाले. त्यानंतर विवाहितेचा आरडाओरडा ऐकून शेजारी असलेल्या नागरिकांनी धाव घेत तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.