आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर बलात्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर बलात्कार केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात 27 सप्टेंबरला किरण विष्णू अंभोरेविरुद्ध भादंविचे कलम 376 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटकही केली. अत्याचारामुळे ही महिला गरोदर राहिली आणि तिने एका मुलीलाही जन्म दिला. दृष्टिक्षेप घटनेवर : आरोपी बाळापूर तालुक्यातील गावातील रहिवासी आहे. काही कारणास्तव महिला सासरहून माहेरी आली. आरोपीने महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर ती महिला नातेवाइकांकडे राहण्यासाठी आली. आरोपीने लग्नाला नकार दिला. अखेर महिलेने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.