आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याच्या विवाहितेची पुण्यात आत्महत्या; घातपाताचा संशय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - सासरच्या मंडळीकडून हुंड्यासाठी होत असलेल्या मानसिक शारीरिक छळाला कंटाळून अकोल्याच्या एका विवाहितेने पुण्यात राहत्या सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. शुभांगी रवींद्र लाहोळे (वय २६) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी िनगडी पोलिसांनी तिचा पती रवींद्र सुरेंद्र लाहोळे (वय ३०), सासरा सुरेंद्र साहेबराव लाहोळे (वय ५०), नणंद वर्षा सुरेंद्र लाहोळे (३०) यांना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात शुभांगीचा भाऊ प्रवीण गावंडे (३१ ,रा. अकोला) याने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. मरोडा येथील गजानन श्यामराव गावंडे यांची मुलगी शुभांगी हिचा विवाह अंबाशी येथील रवींद्र सुरेंद्र लाहोळे याच्यासोबात झाला होता. शुभांगी ही सासरी नांदत असताना, तिला पती, सासरे, नणंद हे नेहमी हुंड्यासाठी मारहाण करत असत. सततच्या त्रासाला कंटाळून शुंभागी हिने िचखलीतील राहत्या कल्पतरू सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी विवाहितेच्या पतीसह सासरा नणंद यांच्याविरुद्ध भादंवि ४९८, ३०६ आणि ३४ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, शुभांगीचा मृत्यू हा इमारतीवरून पडून नव्हे, तर तिच्या सासरच्यांनी तिला जीवाने मारल्याचा आरोप तिच्या भावाने केला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल साळुंखे याबाबत पुढील तपास करत आहेत.

पाचव्या मजल्यावरून पडून शरीरावर नाहीत जखमा
माहेरचीमंडळी तातडीने पुणे येथे पोहोचली. पाचव्या मजल्यावरून पडल्याने शरीराला जी दुखापत व्हायला हवी ती काहीच दिसत नसल्याने माहेरच्यांना शंका आली. शुभांगीला वर्षांचा ओम, तर वर्षांचा जय, अशी दोन मुले आहेत.