आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अकोल्याच्या ‘मेरी कोम’ने दिले प्रियंकाला धडे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - अकोल्याची स्टार नॅशनल चॅम्पियन जरना संघवीने बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्राला बॉक्सिंगचे ‘पंच’ शिकवले आहे. येत्या 5 सप्टेंबरला प्रियंकाचा ‘मेरी कोम’ चित्रपट पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमची भूमिका साकारणार आहे.

जरनाकडून मिळालेल्या मार्गदर्शनाखाली तब्बल दीड वर्षांच्या प्रशिक्षणातून प्रियंकाने चित्रपटात मेरी कोमची प्रभावी भूमिका साकारली आहे. या भूमिकेला अकोल्याच्या युवा खेळाडूचा गोल्डन टच लाभला आहे. भारताची नंबर वन बॉक्सर मेरी कोमच्या संघर्षमय जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात आला आहे. या चित्रपटात मेरी कोमची व्यक्तिरेखा प्रियंकाने साकारली आहे. या वेळी मेरी कोमच्या आयुष्याबद्दल आणि बॉक्सिंग खेळाविषयीची अधिकच जवळून माहिती असलेल्या व्यक्तीचा प्रशिणक्षासाठी शोधाशोध सुरू होता. या वेळी अकोल्याची 23 वर्षीय बॉक्सर जरनाही माजी वर्ल्ड चॅम्पियनसोबत अनेक दिवसांपासून प्रशिक्षण घेत आहे.त्यामुळे प्रियंकाला प्रशिक्षण देण्यासाठी जरनाची निवड केली.

दररोज पाच तास प्रशिक्षण : चित्रपटातील मेरी कोमच्या भूमिकेसाठी प्रियंकाला बॉक्सिंगमधील बारकावे शिकावे लागले. यासाठी तिला दररोज सकाळ आणि रात्री असे विभागून पाच तास बॉक्सिंगचे प्रशिक्षण घ्यावे लागले. तसेच फिटनेससाठी प्रियंका जीममध्येही नित्याने जात होती. त्यामुळे तिला जीमसह बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती, असेही ती म्हणाली.

जरनाचा प्रवास : कोल्याच्या जरना संघवीनेही मेरी कोमसारखा संघर्षमय प्रवास करूनच मोठे यश संपादन केले. तिने करिअरमध्ये दहापेक्षा अधिक राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सहभाग घेतला. यात तिने सातत्याने सुवर्ण आणि रौप्यपदकाची कमाई केली.
प्रचंड मेहनती प्रियंका चोप्रा
सिनेअभिनेत्री प्रियंका चोप्रा प्रचंड मेहनती आहे. तिने अल्पवाधीतच बॉक्सिंगचे आपले प्रशिक्षणही पूर्ण केले. यासाठी मला फारसा काही जास्त त्रास सहन करावा लागला नाही, असेही ती या वेळी म्हणाली.