अकोला- स्पध्रेच्या युगात समाज विकासासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध उपक्रमांतून सामाजिक बांधीलकी जोपासली जाते. सामूहिक विवाह सोहळ्याद्वारे समाजाला दिशा मिळत आहे. त्यामुळे वाल्मीक मेहतर समाजबांधवांनी सामूहिक विवाहासाठी समाजाने एकजूट होऊन सहकार्य करावे, असे आवाहन अपर पोलिस आयुक्त प्रताप निंधाणे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य वाल्मीक मेहतर बावनी पंचायत व बहुउद्देशीय संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब खुले नाट्यगृहात 9 फेब्रुवारी रोजी आयोजित वाल्मीक मेहतर समाजबांधवांच्या सभेत मार्गदर्शन करताना निंधाणे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांताराम निंधाणे होते. प्रताप निंधाणे यांनी बावनी पंचायतने केलेल्या कार्याचाही आढावा घेतला. या वेळी भजन रोहेल, रवी समुद्रे, रमेश घारू, बलराम बामनेट, प्रकाश बामनेट, लखन नकवाल, अनुप खरारे, हरी खोडे, रमेश गोडाले, गुड्ड संकत, मनोज निंधाणे, सोनू पारोचे, रामसिंग डिकाव, ईश्वर थामेत, गणेश टाक, सुनील सारवान, मोहन गांगे, रमेश समुद्रे, अमर खोडे, राजेश थामेत, लक्ष्मण सारसर, उदय कनोरा, विनोद सारसर, अमर डिकाव, प्रताप सारवान, प्रताप झाझोटे, सतीश पटोणे, सुनील नकवाल, बादशाह पारोसे, विजय गोडाले, नारायण मकोरिया, जोगेंद्र खरारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. वर्षभरात आयोजित उपक्रमांची माहिती हरी खोडे यांनी प्रास्ताविकाद्वारे दिली. संचालन उमेश लख्खन यांनी केले. आभार नरेंद्र गोडाले यांनी मानले.
कार्यकर्ते करणार महाराष्ट्र दौरा
समाजहिताच्या दृष्टीने महत्त्वाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे. यामध्येच 23 फेब्रुवारीपर्यंत बावनी पंचायतचे कार्यकर्ते महाराष्ट्रभर दौरा करणार आहेत. समाजाला विकासाची दिशा देण्यासाठी समाजातील अधिकारी, कर्मचारी या दौर्यामध्ये सहभागी होणार आहेत. हा दौरा प्रताप निंधाणे, कन्हैया गिलशेर, भगवान रोंजिया, रमेश तुंडायत, नवल धेळुंदे, नकवाल गुरुजी, सुभाष चव्हाण यांच्या नेतृत्वात आयोजित केला
सभेत घेण्यात आले ठराव
मे 2014 मध्ये सामूहिक विवाह सोहळा व वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करणे, समाजातील उपेक्षित दुर्लक्षिलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवणे, गोगामेढी व रामदेवरा येथे समाजासाठी 100 खोल्यांची धर्मशाळा बांधणे, निधी गोळा करण्यासाठी प्रचार-प्रसार करणे आदी ठराव सभेत मंजूर करण्यात आले.
समाज विकासाची कास- धरा शब्बीर अन्सारी
हुसेनी मेमोरियलच्या वतीने गत आठ वर्षांपासून घेण्यात येत असलेला सामूहिक विवाहाचा उपक्रम समाजासाठी उपयुक्त आहे. सामूहिक विवाह सोहळ्याद्वारे समाजाच्या विकासाची कास मुस्लिम बांधवांनी धरावी, असे आवाहन अ. भा. मुस्लिम ओबीसी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांनी आबासाहेब खेडकर सभागृहात आज पार पडलेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात केले.मुस्लिम समाजातील 34 जोडपे हुसेनी मेमोरियल वेलफेअर सोसायटीतर्फे आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात विवाह बंधनात अडकले. सोहळ्यात पातूर, बाळापूर, मूर्तिजापूर, अकोला परिसरातील मुस्लिम समाजबांधवांची उपस्थिती होती.