आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुढील महिन्यामध्ये महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापौर, उपमहापौरपदासाठी पुढील महिन्यात निवडणूक होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली. सप्टेंबरच्या सात ते दहा तारखेदरम्यान ही निवडणूक होईल. महापालिकेत कोणत्याही पक्षाला बहुमत नसल्याने तसेच विधानसभा नविडणुकीमुळे महापौरपदाची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

२०१२ ला झालेल्या नविडणुकीत काँग्रेसने भाजपवर मात करीत सत्ता ताब्यात घेतली. मात्र, आता समीकरणात बदल झाला आहे. अडीच वर्षाच्या कार्यकाळात महाआघाडीत सामील झालेले अपक्ष तसेच बाहेरून पाठिंबा देणारे अपक्ष हे महाआघाडीवर नाराज आहे.

तसेच अडीच वर्षाच्या कार्यकाळात विकास झाला नाही, असा थेट आरोप काही अपक्ष नगरसेवक करीत आहेत. परंतु, महापौर नविडणुकीत जे सोबत राहतील त्यांचा उपयोग विधानसभा नविडणुकीत होणार असल्याने महापौर नविडणुकीची रंगत वाढली आहे. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष महापौरपद ताब्यात घेण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणार आहेत. महाआघाडी तसेच भाजपप्रणीत महानगर सुधार समिती यांचा नेमका कार्यकाळ किती? याबाबत स्पष्ट खुलासा होत नाही. त्यामुळे महाआघाडीला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांमध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. भाजपचे बंडखोर परतल्याने महानगर सुधार समितीचे संख्याबळ वाढले आहे. त्यामुळे पाच अपक्ष गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरू आहे तसाच काँग्रेसकडूनही सुरू आहे. त्यामुळेच पाच जणांच्या अपक्षांचा गट पाठिंबा देताना स्थायी समिती सभापतीपद मागणार की घोडे बाजाराला ऊत येणार? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. त्यामुळेच महापौरपदाची निवडणूक होईपर्यंत अपक्ष नगरसेवक तसेच अपक्ष नगरसेवकांच्या गटाचा बोलबाला आहे.
काहीही होण्याची शक्यता
राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी मित्र अथवा शत्रू नसतो. त्यामुळे काँग्रेसला शह देण्यासाठी एखाद्यावेळी उपमहापौरपद घेऊन भारिप-बमसं महानगर सुधार समितीलाही पाठिंबा देऊ शकते, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू आहे.