आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरपदासाठी काँग्रेस, भाजपात रस्सीखेच; अपक्षांकडे सर्वांचे लक्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - महापालिकेत खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी महापौरपदाचे आरक्षण निघाले आहे. 9 सप्टेंबरपर्यंत नव्या महापौरांकडे पदभार दिला जाईल. त्यामुळे काँग्रेस व भाजपपैकी कोणाचा महापौर व उपमहापौर होऊ शकतो, यावर राजकीय क्षेत्रात खलबते रंगवली जात आहे. महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर स्थापन झालेल्या सर्वच आघाड्यांची कालमर्यादा संपली आहे. त्यामुळे सर्वपक्षीय एक एक नगरसेवक व अपक्ष मोकळे झाले आहे. प्रत्येकाचे मत ‘मौल्यवान’ झाले आहे.

भाजपने सोडले कमळ, धरली पतंग
भाजपच्या तिकिटावर ज्यांनी नगरसेवकपद मिळवले त्या नगरसेवकांना वगळून पक्षाने इतरांचा विचार करणे सुरू केले आहे. पक्षाचे वरिष्ठ याबाबत निर्णय घेतील, नगरसेवकांनी कुठलीही लुडबूड करू नये, असा नेत्यांचा होरा होता. नगरसेवकांनी लॉबिंग करू नये, असे सांगणारे नेते विधानसभेच्या तिकिटासाठी लॉबिंग करताना आढळले. त्यामुळे ज्यांनी कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली त्यांना महापौरपदापासून दूर ठेवण्याची तयारी सुरू झाल्याची भीती पक्षात आहे. दरम्यान, शिवसेना भाजपच्या महापौरपदाच्या संभाव्य उमेदवारास संमती देण्याच्या मन:स्थितीत नाही. शिवसेनेने असा पाठिंबा दिल्यास विधानसभेत त्यांना याचा फटका बसण्याची चिन्हं आहेत, तर शिवसेनेला स्थायी समिती किंवा उपमहापौरपद द्यावे लागेल, अशी मागणी पुढे रेटण्यात आली.

काँग्रेस म्हणते, आमचाच महापौर
महापालिकेत सर्वाधिक काँग्रेस नगरसेवक विजयी करणारे काँग्रेस नेते विजय देशमुख हे विधानसभेच्या तयारीत आहे. असे असताना त्यांनी पक्ष जो उमेदवार देईल, त्याला महापौर म्हणून विजयी करण्याचा संकल्प घेतला आहे.

येथील सत्ता स्थापन करण्याकडे काँग्रेसनेदेखील लक्ष केंद्रित केल्याचे चित्र आहे. महापौरपदासाठी भारिप-बमसं पुन्हा दावा करू शकते. त्यांना पुन्हा सत्ता स्थापन करण्यास पाठिंबा पाहिजे आहे, अशी माहिती आहे.