आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आम्ही साडेसात दिली, तुम्ही अडीच वर्षे द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- काँग्रेसआघाडीला मागील साडेसात वर्षांपासून सहकार्य केले. या साडेसात वर्षांत सहकार्य करूनही काँग्रेसने मात्र आश्वासने देऊन बोळवण केली. त्यामुळे साडेसात वर्षे दिलेल्या सहकार्याच्या मोबदल्यात आता अडीच वर्षे आम्हाला द्या.
आता आमचा पाठिंबा घेता, आम्हाला पाठिंबा देऊन सत्तेचे समीकरण जुळवा, अशी भूमिका दहा अपक्ष गटाच्या नगरसेवकांनी घेतली आहे. नव्याने निर्माण झालेली ही समीकरणे भाजपला सत्तेपासून हुलकावणीही देऊ शकतात. त्यामुळे आता महापौरपदाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
२००२ मध्ये झालेली महापालिका निवडणूक वगळता २००७ २०१२ च्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. २००७ ला काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक निवडून आले. परंतु, पाठिंबा घेतल्याशिवाय सत्ता ताब्यात घेणे शक्य नव्हते. त्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेससह समाजवादी पक्ष, यूडीएफ, मुस्लिम लीग आणि अपक्ष यांचा पाठिंबा घेऊन पाच वर्षे सत्ता ताब्यात ठेवली. २०१२ च्या निवडणुकीतही कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. परंतु, या वेळी काँग्रेस आणि भाजपला सत्ता ताब्यात घेण्याची समसमान संधी होती. मात्र, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी फारसा पुढाकार घेतला नाही. त्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले. परंतु, काँग्रेसने सत्ता ताब्यात घेताना पुन्हा समाजवादी पक्ष, यूडीएफ, अपक्ष नगरसेवकांचा पाठिंबा तसेच भारिप-बमसंला सोबत घेऊन सत्ता घेतली. या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शहरात विकासाची कामे झाली नाही. भारिप-बमसंने एकतर्फी सत्ता चालवली, तर काँग्रेसकडे उपमहापौरपद असल्याने काँग्रेस हतबल झाली. त्यामुळेच आतापर्यंत साडेसात वर्षांत जे झाले ते झाले. परंतु, आता आमचे सहकार्य मागता आम्हाला सहकार्य करा, अशी भूमिका अपक्ष नगरसेवकांनी घेतली आहे. त्यामुळेच साडेसात वर्षांच्या मोबदल्यास अडीच वर्षे द्या, अशी थेट मागणीच या अपक्ष नगरसेवकांनी केली आहे.
महापौरपद काँग्रेसकडेच
पक्षाचेनिरीक्षक येत्या दोन दिवसांत येत आहेत. त्यानंतर पक्षाचा महापौरपदाचा उमेदवार निश्चित केला जाईल. महापौरपद काँग्रेसकडेच येईल.'' मदनभरगड, महानगराध्यक्ष,काँग्रेस
सर्वानुमते निर्णय घेऊ
अपक्षांनीआतापर्यंत सहकार्य केले आहे. त्यांच्या भावना समजावून घ्याव्या लागतील. त्यासाठीच महाआघाडीची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल.'' दिलीपदेशमुख, गटनेताकाँग्रेस
भूमिका आज जाहीर करू
महापौरपदाच्या निवडणुकीत नेमकी कोणती भूमिका घेणार? याबाबतची नेमकी भूमिका शुक्रवारी स्पष्ट केली जाईल.'' गजाननगवई, गटनेताभारिप-बमसं.
महापौरपद अपक्ष गटाला द्यावे
आतापर्यंतअपक्ष नगरसेवकांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. काँग्रेसने या वेळी अपक्ष गटाला पाठिंबा देऊन अपक्ष गटाकडे महापौरपद द्यावे. '' शेखगंगाबेनीवाले, गटनेताअपक्ष नगरसेवक आघाडी