आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Mayor Ujwala Deshmukh Reach Late In Akola Airport

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख्यमंत्री निघून गेल्यावर खासदार, महापौर स्वागताला; पक्षांर्गत कुरघोडीचे राजकारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला- शहराच्या प्रमुख नागरिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महापौर उज्ज्वला देशमुख खासदार संजय धोत्रे यांच्या अनुपस्थितीने भाजपमधील गटबाजीचे दर्शन मुख्यमंत्र्यांना विमानतळावर झाले.
मुख्यमंत्र्यांचे अकोला विमानतळावर ९.४५ वाजता आगमन झाले. विमानतळावर भाजप-सेनेचे कार्यकर्ते पुष्पगुच्छ हारतुरे घेऊन प्रवेशद्वारावर प्रतीक्षा करत होते, तर विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे, भाजप शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, भारिप बहुजन महासंघाचे बाळापूरचे आमदार बळीराम सिरस्कार, िजल्हाधिकारी जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. देवंेद्रर सिंह, प्रभारी जिल्हा पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार संतोष शिंदे, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचीच उपस्थिती हाेती. महापौर उज्ज्वला देशमुख खासदार संजय धोत्रे येत असल्याची माहिती दिल्यावरही, वेळ कमी असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० वाजता हेलिकॉप्टरने कारंजाकडे रवाना झाले.
पक्षातर्फे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, तर प्रशासनातर्फे विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
दुसऱ्यांदा घडले :
भाजपच्या शतकपूर्ती सोहळ्यातही भाजप शहराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, महापौर उज्ज्वला देशमुख, मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे उपस्थित होते. या सोहळ्याला खासदार संजय धाेत्रे, आमदार रणधीर सावरकर, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार गोवर्धन शर्मा, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात अनुपस्थित हाेते.
योगायोग की गेम :
महापौर उज्ज्वला देशमुख खासदार संजय धोत्रे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात यांना वेळ साधता आली नाही. मुख्यमंत्री अकोल्यात आले असताना या दोन्ही मान्यवरांनी वेळेवर हजर राहायला हवे होते, मात्र तसे झाले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना वेळेवर टेक ऑफ करायला लावून पालकमंत्र्यांनी गेम तर साधला नाही ना, अशीही चर्चा होती.
लढाई की मतभेद
जिल्ह्यातील भाजप नेत्यांमध्ये डॉ. रणजित पाटील हे पालकमंत्री राज्याचे गृहराज्यमंत्री झाले तेव्हापासून वर्चस्वाची लढाई सुरू झालेली दिसून येते. अनेक कार्यकर्त्यांना ते अनेकदा जाणवलेही. मात्र, आपल्याला काय त्याचे असे म्हणून कार्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत आले आहे.