अकोला- पंढरपूरकडे जाणार्या पालखी सोहळ्यातील वारकर्यांना वैद्यकीय सेवा देण्यासाठी फिरते मोफत वैद्यकीय सेवा पथकाने 21 जून रोजी आरएलटी कॉलेजसमोरील गिरीश पंड्या यांच्या निवासस्थान येथून पंढरपूरकडे प्रस्थान केले. र्शी संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीतर्फे भाविकांची सेवा करण्यासाठी या पथकात 8 डॉक्टर व 19 स्वयंसेवकांचा समावेश आहे.
या वैद्यकीय सेवा पथकाद्वारे रुग्ण चिकित्सा, नेत्र चिकित्सा, चष्मा वितरण, पायांची मालीश, मलमपट्टी, रक्त तपासणी (ब्लड शुगर) या वैद्यकीय सेवांसोबतच सकाळी शिरा वाटप व गोरक्षा जागृती करण्यात येणार आहे. डॉक्टरांच्या पथकात केळीवेळी येथील डॉ. राजकुमार बुले, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, कानशिवणीचे डॉ. रमेश बरडे, अंदुराचे डॉ. विजय घंगाळे, डॉ. गीता घंगाळे, शेगावचे डॉ. जनार्दन वानखडे, अकोल्याचे डॉ. मुरलीधर जळमकर आणि नेत्रतज्ज्ञ डॉ. मुकुंद साठे यांचा समावेश आहे. कानशिवणी येथील र्शी गोपालकृष्ण गोसेवा व अनुसंधान केंद्र यांचे सहकार्य मिळाले आहे.
मलमपट्टी विभागाची जबाबदारी गजानन कथलकर, ओंकार आगरकर, प्रमिला डोईफोडे यांच्याकडे, नाष्टा विभागात विठ्ठल वाघ, बोर्डे मामा, सदाशिव खोटरे, संजय वाघमारे, चष्मा वितरण विभागात डॉ. मुकुंद साठे, डॉ. शिवचरणसिंह ठाकूर, राजेश वाघमारे, भोजन विभागात हरिभाऊ तवाळे, देवकाबाई गिरे, शारदा वाघमारे, कल्पना भागिनकार, सुनंदा वाघमारे यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. पायी चालणार्या वारकर्यांचे पायांना मालीश करण्याची सेवा गोपाल घाटे, गजानन हेमणे, फसले, घोंगडे, मंटू वाघमारे, गौरव वाघमारे, प्रवीण कावरे व पुण्यातील भोर मित्र परिवार करणार आहेत. गजानन हरणे, अंबादास, अमोल वाघमारे यांच्याकडे वाहन व्यवस्था, पुणे येथील भारत भोर यांच्याकडे पाण्याच्या टँकरची व्यवस्था, साहेबराव शेळके व विठ्ठलदास हेडा यांच्याकडे जड वाहनांची व्यवस्था, तर संजय वाघमारे, मारुती वाघमारे, अमोल वाघमारे व दादा साबळे वाटेवरील व्यवस्था पाहणार आहे. कानशिवणी येथील र्शी गोपालकृष्ण गोसेवा व अनुसंधान केंद्र, मुंबई येथील महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटना, खामगाव येथील ए क्लास ड्रग्ज अँड फार्मासिटीकल्स, बारामती येथील कै. रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकीय प्रतिष्ठानाचे अध्यक्ष डॉ. विजयकुमार भिसे, नागपूर येथील मे. शिवायू फार्मासी, अकोला जिल्हा केमिस्ट संघटना यांच्यासह अकोल्यातील अनेक संस्था, मेडिकल तसेच अनेक नागरिकांचे सहकार्य लाभले आहे.
शनिवारी पंढरपूरकडे निघालेले हे पथक 8 जुलैला पंढरपूर येथील वारकर्यांना सेवा देऊन अकोल्याकडे प्रस्थान करतील. पथक प्रस्थानाच्या प्रसंगी कालीचरण महाराज, मोहनजी मगाराज (गोकथाकार), प्रकाश वाघमारे, गिरीश पंड्या, बाबुराव पवित्रकार, उमेश कोठारी, प्रा. एल. आर. शर्मा, विनायक शेळके, देवकिसन भट्टड, जितूभाई मोटवाणी, प्रभूदयाल भाला, संजय हेडा यांच्यासह समितीचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.