आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आशेचा किरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या सुमारे ९५ हजार क्विंटल कापसावर आधारित प्रक्रिया उद्योग स्थापन झाल्यास जिल्ह्यातील तेराही तालुक्यांमध्ये जवळपास २६ मायक्रो स्पीनींग प्रकल्पाच्या माध्यमातून धागा निर्मिती करणे शक्य होणार आहे. त्यानुषंगाने बुलडाणा तालुक्यातील डोंगरखंडाळा येथील सुमारे सव्वा कोटी रुपयाचा प्रकल्प आदर्शवत ठरत आहे. विशेष म्हणजे, या एका प्रकल्पामुळे परिसरातील २५० जणांना बारमाही काम मिळाल्याने ग्रामीण भागातील रोजगाराचा प्रश्नही बऱ्यापैकी निकाली निघण्यास मदत होत आहे.

मायक्रो स्पीन क्राप्टेड यान प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्यावतीने आणि बुलडाणा अर्बनच्या पालकत्वाखाली सध्या डोंगरखंडाळा येथे असे एक युनिट सुरू झाले आहे. जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया उद्योग करून स्थानिक पातळीवरील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तरासोबतच त्यांचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. सध्या डोंगरखंडाळा येथील या सुमारे सव्वा कोटी रुपयांच्या प्रकल्पामध्ये प्रतिदिन ९० किलो धागा निर्माण करण्याची क्षमता असून त्यात अलीकडच्या काळात दुपटीने वाढ झाली आहे.
विशेष म्हणजे, मायक्रो स्पीन क्राप्टेड यान प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच हा धागा विकत घेत आहे. सध्या या प्रकल्पामध्ये विणकाम आणि रंगकाम सुद्धा प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आले आहे. गेल्या एक वर्षापासून येथे धाग्याचे उत्पादन होत असून जिल्ह्यातील तेराही तालुक्यातील अशाप्रकारचे प्रकल्प त्यामुळे सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे

प्रोड्युसर आँर्गनायझेन डेव्हलपमेंट फंड (पीअेाडीएफ) आणि लघु कृषक कृषी संघाच्या माध्यमातून काही अटी शर्थीच्या अधीन राहून नाबार्डने अशा प्रकल्पांना सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने पांढऱ्या सोन्याचा पट्टा असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा जीवनस्तर तथा आर्थिक स्तर उंचावण्यास आगामी काळात मदत होईल. तसेच जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म प्रकल्प उभारणीला सुद्धा वाव आहे.
कंपनी स्थापण्यास ‘नाबार्ड’चे सहकार्य
शेतकऱ्यांनीआपल्या शेतामध्ये उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याची आवश्यकता आहे. कारण शेतकऱ्यांच्या अशा कंपनीला काही अटी, शर्थीच्या अधीन राहून नाबार्ड मार्फत पीओडीएफ आणि लघु कृषक कृषी संघाच्या सहकार्यातून वित्तीय पुरवठा, क्षमता बांधणी आणि बाजाराची उपलब्धता करून देण्यात येते. शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने तथा रोजगार निर्मिती वार्षिक १० ते १२ हजार रुपये उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीने या माध्यमातून प्रयत्न केल्या जात आहे. त्याचे आर्थिक आकलन आताच करणे योग्य ठरणार नाही.
मात्र िजल्ह्यामधील डोंगरखंडाळा येथील या प्रकल्पामुळे बुलडाणा जिल्ह्यात किमान सध्या तरी ५० जणांना बारमाही रोजगार तर १०० ते दीडशे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत झाली असल्याची माहिती नाबार्डचे जिल्हा प्रबंधक सुभाष बोंदाडे यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना दिली.
कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म प्रकल्प उभारणीस वाव
जिल्ह्यातदरवर्षी सरासरी ९५ हजार क्विंटल कापसाचे उत्पादन होते. कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म प्रकल्पाला वार्षिक १२० टन कापूस लागतो. जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या कापसाच्या तुलनेत हे प्रमाण अवघे दोन टक्के आहे. त्यामुळे जिल्ह्यात कापसावर प्रक्रिया करणाऱ्या सूक्ष्म प्रकल्प उभारणीस वाव आहे. जिल्ह्यात साधारणत: एक लाख ९० हजार हेक्टर कापसाचे उत्पादन घेण्यात येते. शेतकऱ्यांची स्थिती पाहता ३१ ते ३५ टक्के शेतकरी हे पाच हेक्टर पेक्षा अधिक शेत जमीन धारण करणारे आहे तर ६५ ते ७० टक्के शेतकरी हे अल्पभूधारक आहेत.