आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध दरवाढीमुळे ग्राहकांना फटका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला-खासगी दूध कंपन्यांनी गाय व म्हशीच्या दुधात दोन रुपये प्रती लिटरप्रमाणे दरवाढ केली. ही दरवाढ शुक्रवार, 24 जानेवारीच्या मध्यरात्रीपासून लागू होणार असून, याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. या वर्षी खासगी कंपन्यांनी केलेली ही पहिली दरवाढ ठरणार आहे.
राज्य शासनाने 25 नोव्हेंबरपासूनच दुधाचे दर दोन रुपयाने वाढवले होते. राज्य शासनाच्या पावलावर पाऊल ठेवत खासगी कंपन्यांनीही दूध दरवाढ जाहीर केली आहे. शहरातील आठ लाख लोकसंख्येसाठी दररोज 25 हजार लिटर दूधविक्री होते. यामध्ये शासकीय दूध विक्रीचे प्रमाण अल्प असून, अकोल्यात दररोज सुमारे एक हजार लिटर शासकीय दुधाची विक्री होते. खासगी कंपन्यांचे पाकीटबंद दूध जळगाव, अहमदनगर आदी जिल्ह्यांमधून अकोल्यात आणले जाते.
दररोज 50 हजार रुपयांचा फटका :
अकोला शहरात दररोज सुमारे 25 हजार लिटर दुधाची विक्री होते. 25 जानेवारीपासून जुन्या दरात दोन रुपयाने दरवाढ होत असल्याने अकोलेकरांना दररोज 50 हजार रुपयांचा फटका बसणार आहे.
दरवाढ लागू
खासगी कंपन्यांनी दुधाच्या दरात दोन रुपयाने दरवाढ केली आहे. त्यामुळे 25 जानेवारीपासून नवीन दर लागू होणार आहेत. यापूर्वी दरवाढ करण्यात आली नसल्याने आता खासगी कंपन्यांनी दोन रुपयाने दरवाढ केली आहे. धनंजय गिरीधर, ठोक दूध विक्रेता, अकोला.