आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध विक्रेत्यांनाही परवाना आवश्यक - खाद्यपदार्थ विक्री करणा-यांना डाटा उपलब्ध होणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - दुचाकीवरून दूध विक्री तसेच सर्वच खाद्यपदार्थ विक्रीसाठी आता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेणे आवश्यक आहे. या दृष्टीने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून 500 रुपयांमध्ये परवाने देण्यात येत आहेत. विनापरवाना खाद्यपदार्थांची विक्री करणाºयांवर फेब्रुवारी महिन्यापासून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाने दिली आहे.


डेली नीड्स, छोट्या डेअरी आणि दुचाकीवरून घरपोच दूध विक्री करणा-यांना अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आला आहे. परवाना घेण्यासाठी वेबसाइटवरही अर्ज उपलब्ध राहणार आहे. परवाने घेण्यासाठी मागील महिन्यात अन्न व औषध प्रशासनाद्वारे आवाहन करण्यात आले होते. मात्र, किरकोळ व्यापा-यांकडून नवीन परवान्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती आहे. फेरीवाले, तसेच घरोघरी हातगाडीवाल्यांकडून खाद्यपदार्थ विकले जातात. हे खाद्यपदार्थ जीवघेणे ठरू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दक्षता घेण्यात येत आहे. खाद्यपदार्थांमध्ये भाजी, फळे, कुल्फी, पाणीपुरी, भेळ, बर्फाचा गोळा, दाबेली, कचोरी आदी पदार्थ विक्रेत्यांचा समावेश आहे.
परवाने बंधनकारक करण्यात आल्याने खाद्यपदार्थ विक्री करणा-यांना डाटा उपलब्ध होणार असून, नागरिकांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे. तसेच भेसळयुक्त पदार्थांची विक्री करणा-यांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

परवाना घेणे आवश्यक
४ हातगाडी किंवा दुचाकीवर कोणत्याही खाद्यपदार्थांची विक्री करावयाची असल्यास त्यासाठी परवाना घेणे अत्यावश्यक आहे. 1 फेब्रुवारीपर्यंत व्यावसायिकांनी परवाना घ्यावा. त्यानंतर मात्र परवाना नसलेल्या विक्रेत्यांविरुद्ध शोधमोहीम राबवून त्यांना दंड करण्यात येणार आहे. ’’
नीलेश ताथोड, अन्न निरीक्षक, अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला