आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोघांनी केला अल्पवयीन मुलीचा वनियभंग, पोलिसांची गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - बाभुळगाव येथील एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग गावातीलच दोन युवकांनी केला. याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाभुळगाव येथील १६ वर्षीय मुलगी तिच्या बहिणीसोबत दवाखान्यात गेली होती. या वेळी रस्त्याने येताना सोनू गावंडे अमोल गावंडे या युवकांनी तिची ओढणी ओढली. याबाबत मुलीने जाब विचारला असता दोन्ही युवकांनी तिच्या घरी जाऊन मुलीच्या नातेवाइकांना मारहाण केली दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी गावात तणावाचे वातावरण निर्माण झाल्यानंतर गुरुवारी रात्रीच मुलगी काही महिला पुरुष सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात दाखल झाले. या वेळी मुलीची तक्रार असतानाही पोलिसांनी गुन्हा दाखल करता तक्रार चौकशीत ठेवली मुलीला परतवून लावले. युवकाची दहशत असल्यामुळे शुक्रवारी सकाळी मुलगी गावातील महिला पुरुष पोलिस ठाण्यात आले आणि गुन्हा दाखल करण्याची पोलिसांना विनंती केली. मात्र, सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याची वार्षिक तपासणी सुरू असल्यामुळे पोलिसांनी तक्रार गांभीर्याने घेतली नाही. या वेळी आमच्या जीवाला धोका असतानाही गुन्हा दाखल का करत नाही, अशी भूमिका घेतल्याने त्यांची समजूत काढता पोलिस निरीक्षक डी. डी. ढाकणे यांनी तक्रारदारांना दम भरला आणि काय करायचे करा, माझ्याविरुद्ध कुठे तक्रार करायची करा, असे पीडितेला आणि तिच्या नातेवाइकांना बजावले. मात्र, परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून आणि पोलिस ठाण्यात पोलिस अधीक्षक स्वत: हजर असल्यामुळे अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा पुढील अधिक तपास पोलिस करत आहे.