आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन बेपत्ता अल्पवयीन मुलींचे मृतदेह आढळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिसोड- दोन मैत्रिणी. दोघीही अल्पवयीन. नववी आणि सातवीत शिकणाऱ्या. दुपारी शेतात त्या एका मुलाशी बोलत होत्या. एकीच्या मामाने ते बघितले. अन् नंतर दुसऱ्या दिवशी दुपारी त्यांचे मृतदेहच आढळले. पालक शॉक आणि समाज सुन्न. कशामुळे त्यांनी जीवन संपवलं असावं? पालकांच्या भीतीमुळे की आणखी काही? त्या गेल्या. सगळ्या प्रश्नांची उत्तरं सोबत घेऊन.
वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील ही दुर्दैवी घटना. भोकरखेडा शिवारात गुरुवारी, १५ जानेवारीला सकाळी सवड येथील दोन अल्पवयीन मुलींचे मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आले. या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. या मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार बुधवारी, १४ जानेवारीला ज्ञानबा जाधव यांनी पोलिस ठाण्यामध्ये केली होती. प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. अंजली ज्ञानबा जाधव (१६) आणि वृषाली मारोतराव काळे (१२) अशी मृत मुलींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी अपहरणाच्या संशयावरून बुधवारी रात्रीच एकास ताब्यात घेतले होते.

अंजली सिद्धेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नवव्या तर मूळची दाताळा (िज. हिंगोली) येथील वृषाली सातव्या वर्गात शिकत होती. या दाेघी संक्रांतीसाठी बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बोरं आणण्यासाठी शेताकडे गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या परतल्याच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेतला. दरम्यान, गावातील संतोष सूर्यभान मंडलिक (२१) याने दोघींना दुचाकीवर बसवून गोरख क्षीरसागर यांच्या शेताच्या परिसरात नेल्याचे वृषालीचे मामा दत्तराव सोनुने यांनी पाहिले होते. त्या आधारे अंजलीचे वडील ज्ञानबा जाधव यांनी रात्री रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी रात्रीच मंडलिकला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, गुरुवारी सकाळी भोकरखेडा शिवारातील शेतात दोघींचे मृतदेह तरंगताना आढळले. रिसोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकेशनी जमदाडे आणि दिगंबर कांबळे करत आहेत.
ज्ञानबाजाधव यांनी पोलिस ठाण्यामध्ये केली होती. प्रेम प्रकरणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. अंजली ज्ञानबा जाधव (१६) आणि वृषाली मारोतराव काळे (१२) अशी मृत मुलींची नावे आहेत. दरम्यान, पोलिसांनी अपहरणाच्या संशयावरून बुधवारी रात्रीच एकास ताब्यात घेतले होते.

अंजली ही सिद्धेश्वर विद्यालयामध्ये इयत्ता नवव्या तर मूळची दाताळा (हिंगोली) येथील वृषाली सातव्या वर्गात शिकत होती. या दाेघी संक्रांतीसाठी बुधवारी दुपारी ४.३० वाजताच्या सुमारास बोरं आणण्यासाठी घरून शेताकडे गेल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्या परत आल्याच नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांनी आणि ग्रामस्थांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला. दरम्यान, गावातील संतोष सूर्यभान मंडलिक (२१) याने त्या दोघींना आपल्या दुचाकीवर बसवून गोरख क्षीरसागर यांच्या शेताच्या परिसरात नेल्याचे वृषालीचे मामा दत्तराव सोनुने यांनी पाहिले होते. त्या आधारे अंजलीचे वडील ज्ञानबा जाधव यांनी रात्री रिसोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावर पोलिसांनी रात्रीच मंडलिक याला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र, गुरुवारी सकाळी भोकरखेडा शिवारातील एका शेतात दोघींचे मृतदेह तरंगताना आढळून आले. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, अधिक तपास पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुकेशनी जमदाडे आणि दिगंबर कांबळे करत आहेत.
अहवालआला नाही
शवविच्छेदनाचा अहवाल आला नाही. तो आल्यानंतर तपासाला गती येईल. शिवाय मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. सुरेशकुमारराऊत, पोलिसनिरीक्षक, रिसोड
मृतदेह रेफर टू अकोला
रिसोड येथील वैद्यकीय अधीक्षक हे महिन्यातून तीन दिवस येथे येतात. शिवाय या ठिकाणी महिला वैद्यकीय अधिकारी नाही. परिणामी, शवविच्छेदनासाठी मृतदेह अकोल्याला पाठवण्यात आले.