आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदारांनी घेतली "सम्राट'ची कोठडीत भेट, जमिनीच्या वादातून धमकावल्याचे प्रकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - जमिनीच्या वादातून धमकावल्या प्रकरणी भारिपचे जिल्हा उपाध्यक्ष सम्राट सुरवाडे सध्या पोलिस कोठडीत आहे. पोलिस कोठडीत आपणास मारहाण होत असल्याचा आरोप सम्राटने केल्यामुळे त्याची विचारपूस करण्यासाठी पक्षाचे आमदार बळीराम सिरस्कार यांनी कोठडीत जाऊन भेट घेतली. बुधवारी पोलिस कोठडीची मुदत संपत असल्यामुळे त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

एमआयडीसी परिसरातील एक हेक्टर ३० गुंठे शेती नावावर करून देण्यासाठी सम्राट सुरवाडेने धमकावल्याचा आरोप िमठा वाह सिंधव यांनी केला होता. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सम्राट सुरवाडेला अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याची रवानगी पोलिस कोठडीत केली. मात्र, यादरम्यान पोलिसांनी त्यास बेदम मारहाण केल्याचा आरोप सुरवाडेने केला होता. त्याची तक्रारसुद्धा न्यायालयात करण्यात आली आहे. तेव्हापासून सुरवाडेवर वैद्यकीय उपचार सुरू होते. मंगळवारी सुरवाडेला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. या वेळी सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्याच्या कोठडीमध्ये दुपारी वाजता पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार बळीराम सिरस्कार यांनी भेट घेऊन विचारपूस केली.