आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

८३ सहायक संशोधकांची सेवा बहाल करावी : शर्मा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील ८३ वरिष्ठ कनिष्ठ संशोधकांची सेवा पुन्हा बहाल करा, अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषिमंत्री एकनाथराव खडसे यांना भेटून केली आहे. मंगळवारी दुपारी आ. शर्मा यांनी त्यांची भेट घेतली. यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले. याबाबत दैनिक दिव्‍य मराठीने मंगळवारी वृत्त प्रकाशित केले होते.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या निष्काळजीपणामुळे दहा वर्षांपासून सेवा देणऱ्या संशोधकांना सेवेतून कमी करण्यात आले. त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा झाला आहे. नोकर भरती बंद असल्यामुळे विद्यापीठातील बऱ्याच जागा रिक्त आहेत आणि ज्या ठिकाणी कर्मचारी कार्यरत होते त्यांची सेवा बडतर्फ करण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाला आहे. ८३ जणांना सेवेत सामावून घेऊन न्याय द्यावा, अशी मागणीदेखील आ. शर्मा यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी कुलगुरूंशी संपर्क साधून माहिती घेतली. प्रकल्पग्रस्त, कंत्राटी कामगार तसेच विद्यापीठातील समस्या मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. विस्थापित कर्मचारी, प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिल्याचे आ. शर्मा यांनी कळवले आहे.