आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारात मोबाइल चोरांचा धुमाकूळ; एकास अटक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - शहरातील जनता भाजी बाजारात रविवार, 9 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजताच्या सुमारास भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या अशोक राठी यांचा मोबाइल चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी चोरट्यास शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
या संदर्भात पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास गोरक्षण रोड येथील रहिवासी अशोक मुरलीधर राठी (56) हे जनता भाजी बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेले होते. त्या वेळी त्यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा चार हजार रुपये किमतीचा मोबाइल एका चोरट्याने चोरला. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या चोरीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत शहर कोतवाली पोलिसांनी अकोटफैल येथील पूरपीडित कॉलनीतील रहिवासी अकबर खाँ रसूल खाँ (42) यास अटक केली आहे.
मागील रविवारीसुद्धा जनता भाजी बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी गेलेल्या नीलेश विश्वासराव देशमुख आणि अतुल डोंगरे यांचे मोबाइल चोरट्यांनी सकाळी लंपास केले होते. रविवारी अटक केलेल्या आरोपीकडून मोबाइल चोरट्यांच्या टोळीचा छडा लागण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.