आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेच्या आवारात मोबाइल वापरण्यास शिक्षकांना मुभा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बुलडाणा - मुख्याध्यापक,शिक्षक, विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेच्या कालावधीत माेबाइल वापरावर शासनाने १८ फेब्रुवारी २००९ च्या निर्णयानुसार निर्बंध घातले होते. आता मात्र हे निर्बंध उठवण्यात आले असून, मुख्याध्यापकांची परवानगी घेऊन मोबाइलचा वापर करण्याची मुभा देण्यात आली आहे.

या विकसित तंत्रज्ञानाचा उपयोग शिक्षकांना जनसंपर्क विद्यार्थ्यांसाठी करता यावा, असा शालेय शिक्षण विभागाचा यामागील उद्देश आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित खासगी शाळा, उच्च माध्यमिक शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक इतर माध्यमिक शाळांमधील मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात, वर्गात मोबाइल वापरायचा नाही, असा निर्णय शासनाने घेतला होता. आता सर्वत्र तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे मोबाइल वापरणे सर्वसामान्य झाले आहे. माहिती मिळण्यासाठी जनसंपर्कासाठी मोबाइलचा वापर अधिक प्रमाणात होत आहे. याच उद्देशाने शासनाने पूर्वीचा मोबाइल वापरण्याबाबतचा निर्बंध २८ मे २०१५ रोजी एका शासन निर्णयानुसार शिथिल केला आहे.

जिल्ह्यात दोन हजार १४६ शाळा
जिल्ह्यातएकूण दोन हजार १४६ शाळा अाहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या एक हजार ३०९, उर्दू माध्यमाच्या ११८ शाळा आहेत. पालिकेच्या मराठी ६५ इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे. शासकीय मराठी माध्यामच्या नऊ तसेच खासगी अनुदानित मराठी माध्यमाच्या ३३१ , उर्दू माध्यमाच्या ३९ इंग्रजी माध्यमाची एक शाळा आहे. शिवाय खासगी अनुदानित शाळाही आहेत.

शासन निर्णय अद्याप प्राप्त झाला नाही
शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांच्या विद्यार्थ्यांच्या मोबाइलबाबतचा शासन निर्णय काढला असेल. परंतु, तो निर्णय सध्या पंचायत समितीस्तरावर पोहोचला नाही. त्यामुळे या सत्रात अद्याप तशा सूचना देण्यात आल्या नाहीत. डी.बी. तेजनकर, गटशिक्षणाधिकारी, बुलडाणा

शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्नशील
विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान हा विषय आता शिक्षणात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी मोबाइल उपयोगी पडल्यास शैक्षणिक प्रगतीसाठी ही चांगली बाब आहे. राजूकाकडे, जिल्हाध्यक्ष, शिक्षक संघटना

विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय
विषयानुरूप सामाजिक आणि विस्तृत स्वरुपाची माहिती ही माहिती आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षकांना प्राप्त झाल्यास त्याचा फायदा विद्यार्थ्यांच्या हितासाठी होणार आहे.

अशा आहेत अटी
¾मोबाइलचा वापरशाळेच्या आवारात, वर्गात शैक्षणिक सत्रासाठी म्हणून करता येईल. शिक्षकांना मोबाइलचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करताना मुख्याध्यापकाची पूर्व परवानगी घ्यावी लागणार आहे.
¾मोबाइलचा वापरशाळेच्या आवारात, वर्गात असताना बाहेरील व्यक्तीशी करता येणार नाही, असे करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
¾शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांना शाळेच्या आवारात मोबाइल वापरण्यास मात्र निर्बंध राहणार आहे.