आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अत्याधुनिक तंत्रज्ञान पोहोचणार आता थेट शेतक-यांपर्यंत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - विदर्भातील शेतक-यांचा विकास व्हावा, शेतीत नवनवीन तंत्रज्ञान वापरून उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ प्रयत्नशील असते. कृषी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान प्रसार प्रकल्पाला मंजुरी मिळाली असून, आता विद्यापीठातील तंत्रज्ञान थेट शेतात पोहोचणार आहे.

राज्य शासनाद्वारे राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत तंत्रज्ञान प्रसार हा प्रकल्प विद्यापीठातील विस्तार शिक्षण संचालनालयास मंजूर झाला आहे. या प्रकल्पांतर्गत विदर्भातील ११ जिल्ह्यांत प्रात्यक्षिक, प्रशिक्षण, मेळावे, शिवार फेरी, कृषी प्रदर्शन माती परीक्षण हे उपक्रम राबवण्यात येतील. शेतक-यांच्या शेतावर पीकनिहाय प्रात्यक्षिके प्रशिक्षण होणार आहे. तीन वर्षांत राबवण्यात येणार आहे. या पूर्ण प्रकल्पासाठी कोटी रुपये मंजूर झाले असून, प्रकल्पाच्या पहिल्या वर्षी तीन कोटी रुपये निधी विद्यापीठाला प्राप्त होणार आहे. कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्या मार्गदर्शनात या प्रकल्पाची आखणी केली आहे. डॉ. प्रदीप इंगोले यांच्या नेतृत्वात याची अंमलबजावणी सुरू केली आहे.

असा राबवणार प्रकल्प : विदर्भातील११ जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर पीकनिहाय मार्गदर्शन करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील पीक पद्धती, महत्त्वाचे पीक, वातावरण हे भिन्न असल्याने प्रत्येक ठिकाणी एकच तंत्रज्ञान उपयुक्त ठरत नाही. अशा वेळी तेथील परिस्थितीचे प्रत्यक्ष अध्ययन करून शेतक-यांच्या शेतावर तंत्रज्ञान वापरले जाणार आहे. शेतक-यांना प्रशिक्षण देणे, शिवार फेरी, मेळावे, महिला मेळावे, कृषी प्रदर्शन, माती परीक्षण या टप्प्यांमध्ये प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अकोला, अमरावती, वाशीम आणि नागपूर येथे कृषी संशोधन केंद्रांमार्फत, तर बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर येथे कृषी विज्ञान केंद्रामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

माती परीक्षणाचा फायदा
याप्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील माती परीक्षणावर भर देण्यात येणार आहे. यामुळे शेतातील मातीची स्थिती, त्यातील घटक यांचे अध्ययन करून पिकासाठी आवश्यक असणारे बदल करता येणार आहे.

शेतक-यांना दिलासा
विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतात प्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण घेता येणार आहे. तंत्रज्ञान थेट शेतात पोहोचल्याने उत्पादनात वाढ होणार आहे. अनेक सकारात्मक, चांगल्या बाबींमुळे हा प्रकल्प शेतक-यांना दिलासा देणारा आहे.'' डॉ.प्रदीप इंगोले, संचालक, विस्तार शिक्षण, कृषी विद्यापीठ.