आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi Gulal Launching Case News In Marathi, Airport, Police Officer, Politics

मोदी गुलाल लाँचिंग प्रकरण: पोलिसांसह विमानतळ अधिकारी जबाबदार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - शिवणी विमानतळावर 14 मार्च रोजी केलेल्या मोदी गुलालाच्या लाँचिंगप्रकरणी उपविभागीय महसूल अधिकार्‍यांनी जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांना सोमवारी 24 मार्च रोजी अहवाल सादर केला आहे. या प्रकरणात भाजप नेत्याबरोबर पोलिस आणि विमानतळाचे अधिकारीही जबाबदार असल्याचे चौकशीत समोर आले आहे. दरम्यान, या प्रकरणाची माहिती घेणार आहे, असे निवडणूक निरीक्षक ए. शाहजहाँन यांनी सोमवारी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले आहे.


होळीच्या मुहूर्तावर भाजपतर्फे मोदी गुलाल आणण्यात आला. त्याचे लाँचिंग 14 मार्च रोजी शिवणी विमानतळावरील प्रतीक्षालयात खासदार संजय धोत्रे, आमदार पांडुरंग फुंडकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार डॉ. रणजित पाटील, आमदार हरीश पिंपळे, जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे, हरीश आलिमचंदानी, डॉ. जगन्नाथ ढोणे यांच्या उपस्थितीत केले होते. या प्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्याकडे चौकशीची जबाबदारी सोपवली. प्रा. खडसे यांनी या प्रकरणाची चौकशी करून जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांच्याकडे 24 मार्च रोजी अहवाल सादर केला.


चौकशी अहवालात काय?
उपविभागीय महसूल अधिकारी, चौकशी अधिकारी प्रा.संजय खडसे यांनी मोदी गुलाल प्रकरणाची चौकशी केली. यामध्ये त्यांना भाजप नेत्यांबरोबर पोलिस आणि विमानतळ अधिकारीही जबाबदार असल्याचे आढळले आहे. याप्रकरणी भाजपच्या तालुकाध्यक्षांना नोटीस बजावली होती तसेच विमानतळ अधिकार्‍याकडेही माहिती मागितली होती.


पोलिसच जबाबदार
शिवणी विमानतळावर घडलेल्या प्रकारास पोलिसच जबाबदार असल्याचे अहवालात नमुद आहे. विमानतळ अधिकार्‍यांनी पोलिसांकडे बोट दाखवले आहे. त्यामुळे आता पोलिसांवर कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.