आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Modi News In Marathi, Modi Rally At Akola Issue, Divya Marathi

अकोल्‍यामध्‍ये उद्या होणार नरेंद्र मोदींची सभा; 27 पथकांची नजर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांची सभा रविवारी, 30 मार्च रोजी अकोला क्रिकेट क्लब येथे होत आहे. त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने, निवडणूक आचारसंहितेचा कुठे भंग तर होत नाही ना, हे पाहण्यासाठी शिवणी विमानतळ ते क्रिकेट क्लब मैदानापर्यंत 27 पथकांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक ठिकाणी चित्रिकरण करण्यात येणार असून, अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

भाजपचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार संजय धोत्रे यांच्या प्रचारासाठी येथे नरेंद्र मोदींची ही प्रचार सभा होत आहे. या सभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासन सज्ज झाले आहे. सकाळी 11 वाजता नरेंद्र मोदींची सभा भाजपतर्फे आयोजित केली आहे. सभेदरम्यान किंवा शहरात अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेण्यासाठी प्रशासनाने उपाययोजना केल्या आहेत.याअंतर्गत जिल्हाधिकारी, निवडणूक अधिकारी अरुण शिंदे, पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिर्श, अपर जिल्हाधिकारी शिवाजी दिवेकर, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल खंडागळे, उपविभागीय महसूल अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या नियंत्रणात पथके तयार केली आहेत. ही पथके विमानतळावरील नियंत्रण, जमावाचे चित्रीकरण, वाहनतळावर लक्ष, शहरातील रस्त्यावर नियंत्रण ठेवणार आहे. निवडणूक शांततेत व्हावी, यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत.

उंच इमारतींसह शहराकडे येणार्‍या रस्त्यांवर खडा पहारा
रस्त्यावर बैठे पथक : अमरावती ते अकोला, मंगरुळपीर ते अकोला, वाशिम ते अकोला, बाळापूर ते अकोला, अकोट ते अकोला, गायगाव ते अकोला, आपातापा ते अकोला, मूर्तिजापूर ते अकोला, चांदूर खडकी ते अकोला, येवता कानशिवणी ते अकोला, कुंभारी मार्गे एमआयडीसी ते अकोला.

दृष्टिक्षेपात पथकांचे ठिकाण : विमानतळावरील नियंत्रण व शूटिंग, हेलिपॅडवरील नियंत्रण व शूटिंग, नरेंद्र मोदी यांचे भाषण शूटिंग, नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळाचे चित्रीकरण, सभास्थळाच्या बाहेरील वाहनांचे चित्रीकरण, मंचावरील व्यवस्था, आजूबाजूच्या परिसरातील चित्रीकरण.

वाहनतळ : मनपा मुलींची शाळा, अग्रसेन चौक, एन. एम. चौधरी हायस्कूल, रतनलाल प्लॉट, भाटे क्लब एसटी स्टॅँडजवळ, आरडीजी कॉलेज नेहरू पार्कजवळ, आळशी प्लॉट, होमगार्ड ग्राउंड रामदासपेठ, मुंगीलाल बाजोरिया हायस्कूल.