आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुणी म्हणे मोदी, लोकं म्हणत पाणी-पाणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार, भाजपचे स्टार प्रचारक नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून केलेल्या उपाययोजनांचा फटका जनतेला बसला. मोदींच्या सभेकरिता उसळलेल्या गर्दीमुळे शहरातील बर्‍याच भागातील वाहतूक प्रभावित झाली होती.सभेकरिता शहरात आलेल्या नागरिकांसाठी वाहनतळाची व्यवस्था केली होती. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने तसेच निवडणूक आचारसंहितेचा कुठे भंग होतो का, हे पाहण्यासाठी अकोला विमानतळ ते क्रिकेट क्लब मैदानापर्यंत 27 पथकांद्वारे पाहणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ शूटिंग आणि वरिष्ठ अधिकार्‍यांची उपस्थिती आढळली. सभेला जाण्याकरिता व सभा संपल्यानंतर घरी जाण्याच्या प्रयत्नात नागरिकांनी एकच गर्दी केल्याने शहरात सकाळी 11 ते 11.30 व दुपारी 1 ते 1.30 वाजेदरम्यान रतनलाल प्लॉट चौक, बसस्थानक ते रेल्वे स्टेशन रोड, दुर्गा चौक, सिव्हिल लाइन चौक, पोस्ट ऑफिस चौक या भागात वाहतूक विस्कळीत झालेली आढळली.
वाहनतळावर उसळली गर्दी : वाहनतळाची व्यवस्था मनपा मुलींची शाळा, अग्रसेन चौक, एन. एम. चौधरी हायस्कूल, रतनलाल प्लॉट, भाटे क्लब एसटी स्टँडजवळ, आरडीजी कॉलेज नेहरू पार्कजवळ, आळशी प्लॉट, होमगार्ड ग्राउंड रामदासपेठ, मुंुगीलाल बाजोरिया हायस्कूल या ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था केली होती. येथे क्षमतेपेक्षा अधिक वाहने ठेवली होती.
नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता शहरात काही ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली. मात्र, नागरिकांनी जागा सापडेल तिथे वाहने उभी केली. जनता भाजीबाजारात ठेवलेली ही वाहने.
सुरक्षेसाठी पोलिस
शिवणी विमानतळावर नरेंद्र मोदी यांचे रविवार, 30 मार्च रोजी सकाळी 10.10 वाजता विमानाने आगमन झाले. त्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विमानतळावर आणि प्रवेशद्वारावर बंदोबस्त ठेवला होता. या वेळी आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरिया, माजी क्रीडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे, डी. गोपनारायण आदींनी मोदींचे स्वागत केले. येथे पोलिस निरीक्षक डी. सी. खंडेराव यांच्या नेतृत्वात पोलिस दक्ष होते. सकाळी 7 वाजतापासून ते मोदींच्या विमानाने परत उड्डाण घेईपर्यंत येथे पोलिसांनी करडी नजर ठेवली होती.