आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुक्काम पोस्ट झोलेवाडी : सत्तेचं घळ्य़ाळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘बाप्पू या काँग्रेसवाल्याले आता सर्कातीर ‘हात’ दाखवाच लागते.’
‘काहून हो तुमचं ‘घळ्याळ’ बंद पळलं काय?’
‘आमची घळ्याळ बंद नस्ते पळतं, आमच्या भरोशावर राज्याचं घळ्याळ सुरू हाये ना राजेहो.’
‘मंग तुमी काँग्रेसवाल्यावर काहून खुन्नस काळून रायले.’
‘आमच्या साथीनं राज्याचा गाळा सुरू हाये, आमी हावो म्हून
त्यायले खुच्र्या भेटल्या, सत्ता भेटली, आता आमच्यावरच उलटून राह्यले.’
‘म्हंजे तुमच्या पक्षातले मान्स सत्ता उपभोगून नाई रायले काय, राजा राजकारन म्हनलं का सांभायून घ्या लागते.’
‘काय सांभायून घ्या लागते म्हंता बाप्पू, आमचे साहेब लय मॅच्युअर्ड अन् शांत हाये म्हून पाठींबा नाई काळून रायले, नाईतर समजलं अस्त.’
‘असे कसे पाठींबा काळतीन राजा, त्यायच्या मानसाले असे पैदल करतील का ते, सत्तेचं गनीत येगळ अस्ते.’
‘ते काईबी म्हना काँग्रेसवाले लय काळीबाज हायेत, राष्ट्रवादीले ते फोकसमंदी नाई येवू देत.’
‘तुमचे राष्ट्रवादीवाले काई कमी हायेत काय, तेबी लय चिमटे घेतात ना राजा.’
‘कोन्ते चिमटे घेतले हो आमी?’
‘आपलं राज्य टाप गेअरमंदी नाई चालून राह्यलं म्हनतात, निरा न्युटरल अन् फस्ट गेअरमंदी घरघर करून राह्यलं.’
‘मंग काय चुकलं हो, राज्य टाप गेअरमंदी चाल्लं अस्त तर लय इकास झाला अस्ता.’
‘काहून हसून रायले बाप्पू तुमी.’
‘राजेहो इकास शब्द आयकला की मले लय हसू येते.’
‘कारन’
‘कारन हेच का अजूनलोग कोनालेच इकास
शब्दाचा अर्थ कयला नाई, तरीबी याच
शब्दावर संबंध राजकारनं चालते.’
‘ते काईबी म्हना पन काँग्रेसले इंगा दाखवाच लागते.’
‘काई फायदा नाई, कारन सत्तेच घळ्याळ
चालोन्यासाठी ‘हात’ चाबी देण्यासाठी सतत तयार अस्ते.’