आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुंभारीत पाच वर्षीय मुलीचा विनयभंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोला - स्वत:च्यामुलांसोबत खेळण्यासाठी गेलेल्या एका पाच वर्षीय चिमुकलीचा एका वासनांध व्यक्तीने वनियभंग केला. ही घटना १६ डिसेंबर रोजी दुपारी वाजता कुंभारी येथे घडली. कुंभारी येथील गजानन चित्रे याच्या घरी शेजारी राहणारी पाच वर्षीय चिमुकली त्याच्या मुलांसोबत खेळण्यासाठी गेली.
या मुलीला पाहून गजानन याची नियत फिरली. त्याने या मुलीला त्याच्या घरात नेले आणि तिच्याशी अश्लील वर्तन केले. मुलगी रडू लागल्याने घाबरून जाऊन त्याने मुलीला सोडून दिले. मुलीने घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. चिमुकलीच्या आईने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाणे गाठून पोलिसात तक्रार दिली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी गजानन चित्रे याच्याविरुद्ध ३५४ भादंवि आणि पास्को अधिनियम ७,८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.